Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –24 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्यात पाच जागांचे निकाल हाती आले आहेत. भाजपनं तीन जागांवर तर काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी एक एक जागा जिंकली आहे. विजयी उमेदवारांमध्ये
नंदूरबारहून भाजपचे विजयकुमार
गावीत, धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा मतदार संघातून विद्यमान मंत्री जयकुमार रावल, घाटकोपर
पूर्व मधून पराग शहा, नवापूरमधून काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक तर पुण्यातल्या हडपसर
मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन तुपे यांचा समावेश आहे.
एकूण २८८ जागांपैकी १६६ जागांवर भाजप शिवसेना
महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून महायुती सत्ता कायम राखण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. काँग्रेस-
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार
९५ जागांवर आघाडीवर आहेत. मनसे एका जागेवर तर वंचित बहुजन आघाडीचे
उमेदवार तीन जागांवर पुढे आहे. अन्य २३ जागांवर अपक्ष
उमेदवार पुढे आहेत.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर
दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. ते मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्यापेक्षा
दहा हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
****
बीड जिल्ह्यातील परळी मतदार संघातून राष्ट्रवादी
काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यापेक्षा २६ हजार मतांनी
आघाडीवर आहेत.
तर बीड मतदार संघातल्या अटीतटीच्या
लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर हे शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांच्यापेक्षा
अकराशे मतांनी आघाडीवर आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या आठ मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीच्या उमेवारांनी आघाडी घेतली आहे.
सिल्लोड मतदार संघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार, कन्नड मतदार संघात शिवसनेचे उदयसिंग
राजपूत, पैठण मतदार संघात शिवसेनेचे संदिपान भुमरे, वैजापूर मतदार संघात विजय बोरणारे,
औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मध्ये शिवसेनेचे
संजय शिरसाट आघाडीवर आहेत. फुलंब्री मतदार संघात भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीवर आहेत.
गंगापूर मतदार संघात भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर आहेत. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून
एमआयएमचे डॉ.अब्दुल गफार कादरी आघाडीवर
असून भाजपचे अतुल सावे पिछाडीवर
आहेत.
****
जालना
जिल्ह्यातल्या पाच पैकी तीन मतदार संघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. भोकरदन मध्ये
संतोष दानवे, बदनापूरमधून नारायण कुचे आणि परतूर मतदार संघात बबनराव लोणीकर आघाडीवर
आहेत. तर जालना मतदार संघात काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल पुढे आहेत. घनसावंगीत शिवसेनेचे
हिकमत उधाण पुढे असून राष्ट्रवादी
काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश टोपे पिछाडीवर आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार आघाडीवर
आहेत. उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे आघाडीवर आहेत. तुळजापूर
विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राणा जगजितसिंह पाटील, उस्मानाबाद मतदारसंघातून
शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील तर भूम परंडा मतदार संघातून शिवसेनेचे तानाजी सावंत
यांना आघाडी मिळाली आहे .
****
परभणी
जिल्ह्यातल्या जिंतूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे हे भाजपाच्या मेघना
बोर्डीकर यांना मागे टाकत आघाडीवर आले आहेत. गंगाखेड मधून अपक्ष उमेदवार रत्नाकर गुट्टे
आघाडीवर आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदार
संघात सातव्या फेरी अखेर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे २६ हजार मतांची आघाडवर आहेत.
भोकर मतदार संघातून माजी
मुख्यमंत्री काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण अठ्ठावण्ण हजार मतांनी आघाडीवर आहेत.
****
कराड दक्षिण मतदार संघातून काँग्रेसचे
पृथ्वीराज चव्हाण पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत.
ठाणे जिल्ह्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदार
संघात शिवसेनेचे एकनाथ शिंदे ४८ हजार ३६५ मतानी आघाडीवर आहेत. धुळे ग्रामीण मतदार संघात
चौदावी फेरी अखेर कुणाल पाटील सात हजार सहासे मतांनी आघाडीवर आहेत. मुंबईच्या वरळी मतदार संघातून शिवसेनेचे आदित्य
ठाकरे २७ हजार ६ मतांनी आघाडीवर आहेत.
लातूर शहर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे
अमित विलासराव देशमुख अठरा हजार ९२३ मतांनी तर लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे
धीरज देशमुख ३४ हजारावर मतांनी आघाडीवर आहेत.
नाशिक
मतदारसंघात एकूण १५ जागापैकी भारतीय जनता पक्ष ५ जागांवर, शिवसेना २ ,राष्ट्रवादी क़ॉंग्रेस
सहा जागांवर कॉग्रेस १ आनि एमआयएम एका जागेवर आघाडीवर आहे. उस्मानाबाद मतदारसंघातल्या
उमरगा इथून १४ व्या फेरीअखेर शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे १७ हजारावर मतांनी आघाडीवर
आहेत.
सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी
काँग्रेसचे श्रीनिवास पाटील हे आघाडीवर असून भारतीय जनता पक्षाचे उदयनराजे भोसले हे
पीछाडीवर आहेत.
****
No comments:
Post a Comment