Tuesday, 29 October 2019

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****
भाजपनं शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यासंदर्भातील आश्र्वासन कधीही दिलेलं नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यावर त्यांनी गेल्या अठरा फेब्रुवारी रोजी एका पत्रकार परिषदेत या संदर्भात केलेल्या एका विधानाची चित्रफीत शिवसेनेनं आज समाज माध्यमांवर प्रसारित केली. मुख्यमंत्र्यांनी यावरील आपला शब्द फिरवला आहे, असं या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नसल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. या पार्श्र्वभूमीवर महायुतीतील या पक्षांमध्ये सत्तेतील वाट्यासंदर्भातील संघर्ष अद्याप कायम असल्याचं जाणवत आहे.
***
शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडावा, उपमुख्यमंत्रीपद घ्यावं, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुचवलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेनं राज्य तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी खाती घ्यावी, असंही आठवले यावेळी म्हणाले.
***
राज्यात नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे सुमारे पंचेचाळीस आमदार भाजपशी हात मिळवणी करण्यास तयार असून त्यांना मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच हवे आहेत, असं भाजप समर्थक राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
***
रिझर्व बँकेनं पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील ठेवी सुरक्षित असल्याची खात्री द्यावी आणि या बँकेचं पुनरुज्जीवन करावं, अशी मागणी या बँकेच्या खातेदारांनी केली आहे. नवी मुंबईत रिझर्व बँकेच्या कार्यालयासमोर या बँकेचे खातेधारक आज जमा झाले होते, त्यावेळी ही मागणी करण्यात आली. या बँकचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं खातेधारकांच्या रक्कम काढण्यावर मर्यादा घातली आहे.

***
परतीच्या मुसळधार पावसामुळे विविध पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अस संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली आहे. त्यांनी या मागणीचं पत्र केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती अकोला इथं पत्रकारांना दिली. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर, पातूर, बार्शीटाकली, तेल्हारा आणि आकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. 
***
बुलडाणा तालुक्यातल्या चिखला शिवारात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी काल कृषी, मृदा आणि जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी केली. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागाच्या यंत्रणेसोबत विमा कंपनी प्रतिनिधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्याच्या सूचना डवले यांनी दिल्या. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी मोहिम स्वरूपात पूर्ण करावे, असे निर्देश बुलडाणा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी यासंदर्भात आढावा बैठकीत काल दिले.
***
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातले नवनिर्वाचित आमदार मोहनराव हंबर्डे यांनी काल सोनखेड सर्कल मध्ये शेतावर जाऊन पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करतांना एकही शेतकरी विसरून राहू नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना हंबर्डे यांनी कृषि विभागाचे कर्मचारी आणि तलाठी यांना केली.
***
ा नुकसानीच्या पार्श्र्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानाची माहिती वैयक्तिकरित्या संबंधित विमा कंपनीचे समन्वयक अथवा ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे, त्या बँकेकडे विहित नमुन्यात त्वरीत सादर करावी, असं वाशिम जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
***
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पोटुळ ते लासुर रेल्वेरुळा दरम्यान एका स्थानिक शेतकऱ्यानं रुळाला तडे गेल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळं मुंबई-नांदेड-हैदराबाद मार्गावरील गाड्यांची गती कमी केली जाणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे. अपघात टाळण्यासाठी या रेल्वे मार्गावरील गती मर्यादा ३० किमीपर्यंत निश्चित केली असुन, दोन दिवसांत दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याची ग्वाही रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
***
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील पाताळगंगा पुलावरून वाहून गेल्यानं एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी पाणी वाहत असतांना दुचाकीस्वार ज्ञानेश्वर मुंढे, या तरूणानं पुलावरून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला, त्यात तो पुरात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह एका झाडाला अडकलेला सापडला आहे.
//***********//

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...