Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –24 October 2019
Time 12.00 to 12.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४
ऑक्टोबर २०१९ दुपारी १२.०० वा.
****
विधानसभा
निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. नंदूरबार मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार गावित विजयी झाले आहेत. गावीत
यांना एक लाख बारा हजार सातशे त्र्याण्णव मतं मिळाली. राज्यात भाजप शिवसेना महायुती पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने
वाटचाल करत आहे. सर्व २८८ जागांपैकी २८३ जागांचे कल हाती आले आहेत. भाजप ९९, शिवसेना
६१, काँग्रेस ४१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४९ जागांवर आघाडीवर आहे. प्राप्त कलांनुसार
१५ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर
आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या आघाडीतील
काँग्रेसच्या तुलनेत सरस कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या
जागा हा पक्ष कायम राखताना दिसत आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या नऊपैकी आठ मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीनं आघाडी घेतली आहे. औरंगाबाद
मध्य मतदारसंघातल्या शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल चौदा हजार ७६ मतांनी
आघाडीवर आहेत. औरंगाबाद पश्चिम मधे शिवसेनेचे संजय शिरसाट तेरा हजार ३३० मतांनी आघाडीवर
आहेत. औरंगाबाद कन्नड मतदार संघात शिवसनेचे उदयसिंग राजपूत आघाडीवर आहेत. पैठण मतदार
संघात शिवसेनेचे संदिपान भुमरे आघाडीवर आहेत. सिल्लोड मधे शिवसेनेचे अब्दुल सत्तार
पंचवीस हजार मतांनी आघाडीवर आहेत. फुलंब्री मतदार संघात भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीवर
आहेत. गंगापूर मतदार संघात भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर आहेत. औरंगाबाद पूर्व मतदार
संघात एमआयएमचे डॉ.अब्दुल गफार कादरी एकोणचाळीस हजार मतांनी आघाडीवर आहेत.
****
जालना
विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे कैलास गोरंट्याल
यांनी तीन हजार १५२ मतांनी आघाडी घेतली आहे.. परतूर मतदार संघात भाजपाचे बबनराव लोणीकर
यांना आठ हजार ९४१ मतांची आघाडी मिळाली आहे.
****
बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर
हे अकराशे मतांनी पुढं आहेत. परळी मतदारसंघातून दहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी कॉग्रेसचे धनंजय मुंडे हे
१३ हजारावर मतांनी आघाडीवर आहेत. केज मतदारसंगातून
भाजपच्या नमिता मुंदडा या आघाडीवर आहेत.
लातूर
शहर विधानसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर कॉंग्रेसचे अमित देशमुख ११०८ मतांनी आघाडीवर
आहेत. निलंगा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे आघाडीवर आहेत. औसा इथं भाजपचे अभिमन्यू पवार आघाडीवर आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या भूम परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सांवत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
राहुल मोटे यांना मागं टाकत आघाडीवर आहेत. उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास
पाटील आघाडीवर आहेत.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय निंबाळकर यांना मागं टाकलं
आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या वसमत मतदार संघातून शिवसेनेचे डॉ.जयप्रकाश मुंदडा आघाडीवर आहेत. कळमनुरीमधून
शिवसेनेचे संतोष बांगर ११ हजार ८०० मतांनी आघाडीवर आहेत.
****
परभणीच्या
जिंतूर मतदारसंघातून भाजपाच्या मेघना बोर्डीकर २४ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यात भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, नायगाव मतदारसंघातून
भारतीय जनता पक्षाचे राजेश पवार, किनवट मधून भाजपचे भीमराव केराम मुखेड मधून तुषार
राठोड, देगलूर मधून कॉग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर नांदेड दक्षिणमध्ये कॉग्रेसचे मोहन
हंबर्डे नांदेड उत्तर मधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर सध्या आघाडीवर आहेत.
****
अहमदनगर मतदार संघातून राष्ट्रवादी
काँग्रेसचे संग्राम जगताप सात हजार
७२० मतांनी पुढे, शिर्डी विधानसभा मतदारसंघ भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील सातव्या फेरी
अखेर ३० हजार ४४७ मतांनी आघाडीवर, पारनेरमधून चौदाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे
निलेश लंके यांना २८ हजार मतांची आघाडी आहे.
****
पालघर जिल्ह्यात नालासोपारा मतदार
संघातून क्षितीज ठाकूर
10,994 मतांनी आघाड़ीवर तर ऐरोली विधानसभा मतदार
संघातून भाजपचे गणेश नाईक 35 हजार
मतांनी पुढे आहेत.
सांगली जिल्ह्यातील तासगाव - कवठे महांकाळ
मतदार संघातून राष्ट्रवादी
काँग्रेसच्या उमेदवार सुमन पाटील पाचव्या फेरी
अखेर 29,000 मतानी आघाडीवर.
कळवा मूंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे
जितेंद्र आव्हाड आघाडीवर
अणुशक्ती नगर विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक चार हजार ४४७ मतांनी
पुढे असून
वांद्रे पश्चिम मतदार संघातून भाजपचे आशिष शेलार २३ हजार ६४५मतांनी आघाडीवर आहेत.
अकोला
जिल्ह्यात अकोला पूर्वमधून भाजपाचे रणधीर सावरकर
आघाडीवर आहेत,अकोला पश्चिममधून काँग्रेसचे साजिद पठाण,अकोटमधून भाजपाचे प्रकाश भारसाखळे,बाळापूरमधून
शिवसेनेचे नितीन देशमुख,मुर्तीजापूरमधून वंचित बहुजनच्या प्रतिभा अवचार पुढे आहेत.
अकोला पश्चिम मधून सहावी फेरी अंती काँग्रेसचे साजिद खान पठाण तबबल १४ हजार ४०० मतांनी आघाडीवर आहेत.
****
धुळे जिल्ह्यातल्या
शिरपूर मतदारसंघातून भाजपाचे कांशीराम पवार आघाडीवर आहेत. धुळे जिल्ह्यातल्या साक्री
मतदारसंघातून अपक्ष मंजुळा गावीत ७ हजार ३०० मतांनी पुढे आहेत.शिंदखेडा मधून भाजपाचे
जयकुमार रावल राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बोडसे यांच्यापेक्षा ३० हजार १३८ मतांनी
पुढे आहेत.
****
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर मतदारसंघातून भाजपाचे कांशीराम
पवार आघाडीवर आहेत.धुळे जिल्ह्यातल्या साक्री मतदारसंघातून अपक्ष मंजुळा गावीत ७ हजार
३०० मतांनी पुढे आहेत.शिंदखेडा मधून भाजपाचे जयकुमार रावल राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप
बोडसे यांच्यापेक्षा ३० हजार १३८ मतांनी पुढे आहेत.
****
No comments:
Post a Comment