Wednesday, 30 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरबच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले आहेत.  तिथल्या प्रमुख नेत्यांशी झालेल्या चर्चेला पंतप्रधानांनी एका संदेशात लाभकारी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान झालेल्या करारानुसार भारत आणि सौदी अरेबिया यांनी एक धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे. यात दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्धार झाला असून परस्पर हितांच्या क्षेत्रातल्या १२ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
****
भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून देण्याच्या सुत्रावर अतिम निर्णय घेतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचं त्यांनी समर्थन केलं आहे. राज्यातील जनादेश महायुतीला होता असं नमुद करून भाजपही सत्तास्थापनेसंदर्भात अन्य पर्यायांचा विचार करू शकते, असं वनमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  या पार्श्वभुमीवर भाजपच्या आमदारांची नेता निवडीसाठी आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान नवी मुंबईतल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार महेश बालदी यांच्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण भरलं असून धरणाच्या परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे मांडओहळ धरण भरलं नव्हतं. यंदा मात्र परतीचा पाऊस तसंच अवकाळी पावसानं हे धरण भरलं आहे.
****
नांदेड शहराजवळ असलेल्या वाजेगाव इथल्या एका गोदामातून काल १७० पोती सुंगधी मसाला गुटखा छापा टाकून जप्त करण्यात आला. या अवैध गुटख्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
****


No comments: