Thursday, 24 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.10.2019 11.00 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –24 October 2019
Time 11.00 to 11.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –२४ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधानसभा निवडणुकीतील निकालांचे कल हाती येत आहेत. भाजप शिवसेना महायुती १७८ जागांवर आघाडीवर असून बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत आहे.  काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी ८९ जागांवर आघाडीवर आहे. वंचित बहुजन आघाडी दोन जागांवर आघाडीवर आहे. अन्य उमेदवार १९ जागांवर पुढे आहेत. .

सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उदयनराजे भोसले हे  दहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील या मतदारसंघात आघाडीवर आहेत.
****
औरंगाबाद मध्य मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना चौथ्या फेरीअखेर दहा हजार २८२ मतांची आघाडी मिळाली आहे.
औरंगाबाद पश्चिममधे दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे संजय शिरसाट पाच हजार ८७३ मतांनी आघाडीवर आहेत.
कन्नड मतदार संघात शिवसनेचे उदय सिंग राजपूत आठ हजार ९६९ मतांनी आघाडीवर आहेत.
औरंगाबाद पूर्व मध्ये तिसऱ्या फेरी अखेर एमआयएमचे डॉ.अब्दुल गफार कादरी १७ हजार २४ मतांनी आघाडीवर आहेत.

सिल्लोड मधे शिवसेनेचे अब्दुल सत्तार सतरा हजार ४०३ मतांनी आघाडीवर आहेत.

पैठण मतदार संघात पहिल्या फेरी अखेर शिवसेनेचे संदिपान भुमरे एक हजार ४११ मतांनी आघाडीवर आहेत.
फुलंब्री मतदार संघात दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे हरिभाऊ बागडे तीन हजार ३२० मतांनी आघाडीवर आहेत.
वैजापूर मतदार संघात शिवसेनेचे विजय बोरनारे एक हजार २९८ मतांनी तर गंगापूर मतदार संघात भाजपचे प्रशांत बंब सहा हजार ७१६ मतांनी आघाडीवर आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे २८६ मतांनी आघाडीवर आहेत.
बदनापूर विधानसभा मतदासंघात पहिली फेरी अखेर भाजपचे नारायण कुचे हे सात हजार  मतांनी आघाडीवर आहेत.
जालना मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अर्जून खोतकर ३९० मतांनी आघाडीवर आहेत.
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर मतदार संघातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मोहनराव पाटील आघाडीवर आहेत.भारतीय जनता पक्षाचे विनायकराव पाटील यांना त्यांनी मागं टाकलं आहे. निलंगा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर आहेत.लातूर ग्रामीणमधून कॉंग्रेसचे धीरज देशमुख साडे अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत.
****
बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर हे ५८ मतांनी पुढे आहेत केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नमिता मुंदडा या अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत. बीड मधील परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे भाजपच्या पंकजा मुंडें यांच्यापेक्षा साडे सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत.
****
  उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे कैलास पाटील हे १५११ मतांनी आघाडीवर आहेत. उमरगा लोहार मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे १७ हजार १८९ मतांनी आघाडीवर आहेत
लोहा मतदारसंघातून शेकापचे श्मामसुंदर शिंदे आघाडीवर आहेत तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे आघाडीवर आहेत परंडा तानाजी सावंत आघाडीवर आहेत.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संतोष बांगर हे ३५ हजार ८३५  मतांनी आघाडीवर आहे,
नाशिक मध्य मधून भाजपच्या देवयानी फरांदे ७०९० मतांनी आघाडीवर आहेत
 शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल हे आघाडीवर आहेत
****
परभणीच्या गंगाखेड मतदारसंघातून शिवसेनेचे विशाल कदम तर जिंतूरमधून भाजपाच्या मेघना बोर्डीकर आघाडीवर आहेत.
जऴगाव ग्रामिण मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील हे आघाडीवर आहेत.
दक्षिण सोलापूरमधे भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर आहेत.
रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धऩ मतदार संघातून राष्ट्रवादीच्या अदीती तटकरे आघाडीवर आहेत.
कल्याण ग्रामिण मनसेचे पाटील आघाडीवर आहेत.
सातारा जिल्ह्यातल्या फलट मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हण आघाडीवर आहेत.
सातारा जिल्ह्यातल्या दक्षिण कराड मतदार संघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर
आहेत.
सांगली जिल्ह्यातल्या तासगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेच्या सुमनताई आर आर पाटील आघाडीवर आहेत. तर इस्लामपूर मतदार संघात जयंत पाटील आघाडीवर आहेत.
कोल्यातून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर आहेत.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या ११ विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर सांगोल्यातून शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील, मोहोळमधून शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर, पंढरपूरमधून सुधाकरपंच परिचारक, बार्शीतून दिलीप सोपल तर अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आघाडीवर आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख यांनी आघाडी घेतली आहे.
****
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे  १८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. कराड मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण  हे आघाडीवर आहेत.
****


No comments: