Thursday, 31 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****

 लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज देशभर एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. नांदेड शहरात गांधी पुतळा ते सरदार वल्लभ भाई पटेल पुतळा अशी एकता दौड आज काढण्यात आली. महापालिका आयुक्त लहुराज माळी यावेळी प्रमुख उपस्थित होते. जालना इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून एकता दौडला सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यावेळी प्रमुख उपस्थीत होते. अमरावती, सांगली इथंही सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचं आयोजन करण्यात आलं. 
****

 भाजपनं राज्यात शिवसेनेला सत्तेतील समान वाटा देण्यासंदर्भात आश्र्वासन दिलेलं नव्हतं या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबद्दल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षांच्या नवनियुक्त आमदारांच्या मुंबईत झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी २०१४च्या तुलनेत यंदा शिवसेनेला सत्तेतील अधिक वाटा मिळावा यावर भर दिल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. भाजपनं सत्तेतील सहभागाबद्दल अद्याप कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याची माहितीही ठाकरे यांनी यावेळी दिली.
****

 दरम्यान, शिवसेनेच्या विधीमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची या बैठकीत एकमतानं फेरनिवड करण्यात आली. प्रथमच आमदार झालेले आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. प्रताप सरनाईक यांनी त्याला अनुमोदन दिलं. सुनील प्रभू यांची विधानसभेतील पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली. एकनाथ शिंदे हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणन निवडून आले आहेत.
****

 राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भातील निर्णय घेण्यासंदर्भातले सर्व अधिकार पक्षप्रमुख ठाकरे यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून ते  घेतील त्या निर्णयाचं आपण पालन करू, असं शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आज संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यातील अनेक भागांतील अत्याधिक पावसामुळे सोयाबीन, भात शेती आणि द्राक्षांचं नुकसान झालं असून त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी या भेटीवेळी राज्यपालांकडे केली जाईल, अशी माहिती या संदर्भात सुनील प्रभू यांनी दिली.
****

 काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांचीही आज मुंबईत बैठक झाली. पक्षाचे महासचिव मलिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थीत होते. लवकरच क्षांच्या वरिष्ठांच्या नेतत्वाखाली क्षांच् क्षांच्या विधीमंडळ नेत्याची निवड केली जाईल, असं खरगे यावेळी म्हणाले. तत्पर्वी, पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्विराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन  चर्चा केली.  
****

 जायकवाडी धरणातील पाण्याचा अपव्यय होऊ नये याकरता स्वयंचलित पाणी सोडण्याची तसंच कालव्यांची योग्य निगा राखण्याची व्यवस्था आवश्यक असल्याचं जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी म्हटलं आहे. एकशे दोन पूर्णांक सात दशांश अब्ज घनफूट- `टीएमसी` क्षमतेच्या या धरणाला सत्तावीस दरवाजे असून तिनशे चाळीस किलोमीटर लाबींचे दोन कालवे आहेत. त्यातून समान पाणी वाटप निश्चित होण्यासाठी या व्यवस्थेचा उपयोग होईल, असं काळे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची अवस्था वाईट झाली असून त्यामुळे तिस ते चाळीस टक्के पाणी वाया जात आहे. कालव्यांच्या दुरुस्तीनं मोठ्या प्रमाणावर पाणी वाचवता येईल आणि शेतकऱ्यांची गरज भागवता येईल, असंही काळे यांनी यासंदर्भात नमुद केलं आहे. गोदावरी मराठवाडा जलसिंचन विकास महामंडळ या संदर्भात स्वयंचित पाणी वाटपाच्या व्यवस्थेच्या शक्यते संदर्भात अभ्यास करत असल्याचं पीटीआयच्या वृत्तात नमुद करण्यात आलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्याच्या बाभळी बंधाऱ्याचे सर्व चौदा दरवाजे उघडण्यात आले आहेत. मागच्या सहा वर्षात प्रथमच यंदा परतीच्या पावसामुळे बाभळी बंधाऱ्यात पुर्ण क्षमतेनं पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बाभळी बंधाऱ्याची पाणी साठवन क्षमता दोन पूर्णांक चौऱ्याहत्तर दशांश अब्ज घनफूट-  `टीएमसी` आहे.
****

 नाशिक जिल्ह्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या पावासामुळे सुमारे ५० टक्के खरीप पीकांचं नुकसान झालं असून, जिल्हा प्रशासनानं तातडीनं पंचनामे करण्याचं काम सुरू केलं आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज सटाणा इथं  भेट देऊन या नुकसानीची पाहणी केली.
****

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे आणि परतीच्या पावसामुळं झालेल्या शेती आणि मच्छिमारांच्या नुकसानीचा आढावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे घेऊन तातडीनं पंचनाम्यांचे आदेश प्रशासनाला दिले.
****

 बुलडाणा जिल्ह्यातल्या कापूस पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव नष्ट करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलं.
*****
***

No comments: