आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ डिसेंबर २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
रेल्वे विभागाच्या आधुनिकीकरणासाठी येत्या बारा वर्षात
पन्नास लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून
ही गुंतवणूक उभारली जाईल, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. ते काल नवी
दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या गुंतवणुकीच्या माध्यमातून रेल्वेचं आधुनिकीकरण,
वाहतुकीचा खर्च कमी करणं, रेल्वे प्रवास जागतिक दर्जाचा बनवणं आणि रेल्वे वाहतुकीमध्ये
मालवाहतुकीचा सहभाग वाढवणं शक्य होईल, असं ते म्हणाले. बांधकाम व्यवसाय आणि बँकेतर
वित्तीय कंपन्यांना कर्जपुरवठा किंवा वित्तपुरवठा करताना धाडसी निर्णय घेता यावे, यासाठी
सरकार बँकांना पूर्ण पाठिंबा देण्याचा प्रयत्न करेल, असं वाणिज्य मंत्री या नात्यानं
गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
सरकारी शाळांमध्ये ५००
कौशल्य विकास केंद्र आणि प्रयोगशाळा उभारण्यासाठीच्या योजनेला, कौशल्य विकास आणि उद्योजक
मंत्रालयानं अंतिम स्वरुप दिलं आहे. कौशल्यपूर्ण भारत घडवण्याचं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी,
स्कील इंडिया मोहीमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण द्यायचा
सरकारचा उद्देश आहे. त्या अनुषंगानंच मंत्रालयानं कौशल्य प्रशिक्षणासाठी अनेक उपक्रम
हाती घेतले आहेत, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या
विरोधात काल नवी दिल्ली इथं आंदोलकांनी केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर दिल्ली पोलिसांनी
४० जणांना अटक केली आहे. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह
काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर हिंसक
घडामोडी आणि जाळपोळीमध्ये सामील असलेल्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी
बजावलं आहे.
स्थानिक पोलिसांच्या
मदतीसाठी सुरक्षारक्षकांच्या ५८ तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात मुख्यत्वेकरुन
दिल्लीबाहेरचे लोक सामील होते.
*****
***
No comments:
Post a Comment