आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ जानेवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
नेताजी सभुाषचांद्र बोस यांची जयंती निमित्त, आज देशभर
पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
आज संध्याकाळी इंडीया गेटवर नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं आनावरण करण्यात येणार
आहे.
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जयंती
निमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली
अर्पण केली आहे. जनसामान्याच्या पाठीशी उभे राहणारे अतुलनीय नेतृत्वासाठी
बाळासाहेब सदैव स्मरणात राहतील. असं मोदी यांनी ट्विटर संदेशात
म्हटलं आहे.
***
पर्यावरण पूरक जीवन शैलीचं अनुसरण केलं, तर २०
वर्षानंतर आपल्या पुढच्या पिढीला शुद्ध वायू आणि पाण्याच्या स्वरूपात त्याचं फळ
मिळणार असल्याचं मत औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी
व्यक्त केलं आहे. औरंगाबाद शहरातल्या खाम नदी काठावर काल श्रमदान केल्यानंतर ते
नागरिकांशी संवाद साधत होते.
***
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करु या, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.
जिल्ह्यातल्या नूतन साहित्य मंदिर वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त
भरवलेल्या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते.
***
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवशीय क्रिकेट मालिकेतला
तिसरा आणि अंतिम सामना आज केपटाऊनमध्ये न्यूलँड्स
क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.
***
संक्षिप्त बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद -
AURANGABAD AIR NEWS या यू ट्यूब चॅनेलवर पुन्हा ऐकू शकता.
No comments:
Post a Comment