Sunday, 9 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०९ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

शिखांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंदसिंह यांची आज ३५५ वी जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशपर्वा निमितं सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुगोविंदसिंह यांचं जीवन आणि विचार हे लाखो लोकांना बळ देतात, असं मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

उद्या १० जानेवारी पासून राज्यात ६० वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे, आधी जी लस दिली असेल त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जाईल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

****

औरंगाबाद इथल्या खाम नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढवून या कार्याला आणखी पुढे नेण्याचा मानस आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद शहरातून वाहणाऱ्या खाम नदी पुनरुज्जीविन अभियानाअंतर्गत कामाची आमदार अंबादास दानवे, प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, आणि अधिकारी वर्गाने काल पाहणी केली. त्यावेळी दानवे बोलत होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा शाकंभरी नवरात्र महोत्सव यंदा १० ते १८ जानेवारी दरम्यान कोविड प्रतिबंधक निर्बंधांमुळे साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे, असं मंदिर समितीनं कळवलं आहे.

****

नांदेड शहरात आज पहाटे हलक्या स्वरूपाचा बिगरमौसमी पाऊस झाला. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद पंचायत समितीच्या उपसभापतीपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. युवराज ठेंगडे यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती.

****

कोविड संदर्भातील नियमांचं भंग करणाऱ्या औरंगाबादमधल्या शाही भोज थाली रेस्टॉरंटवर काल कारवाई करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासने या रेस्टॉरंटची तपासणी केली असता आसन क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहक आढळून आले. त्यामुळे ही आस्थापना आता पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही अन्न आणि औषध प्रशासने दिले आहेत.

//***********//

  

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...