Sunday, 16 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी रीयर ॲडमिरल के पी अरविंदन यांनी मुंबईच्या नौदल गोदीचे ॲडमिरल सुपरिटेंडन्ट म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी रीयर ॲडमिरल    बी. शिवकुमार यांच्याकडून काल हा पदभार स्वीकारला.

****

पिकांवरच्या रासायनिक फवारण्यांच्या वापरामुळे येत्या १५ वर्षात कर्करोगाचं प्रमाण ५० टक्क्यांनी वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर द्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. गुजरात इथं शेतकऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल ते बोलत होते. आपल्या लोकसभा मतदार संघात ५० टक्के शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित करण्याचं उद्दिष्ट निर्धारित केल्याचं शाह यांनी यावेळी सांगितलं.

****

भारत निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांवर लादलेल्या प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्यावरील निर्बंधांची कालमर्यादा २२ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. मात्र आयोगानं या पक्षांना काही बाबतीत सूट दिली असून, बंदिस्त सभागृहांत होणाऱ्या बैठकांमध्ये कमाल ३०० जणांना किंवा संबंधित सभागृहाच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के लोकांना किंवा राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणनं निर्धारित केलेल्या मर्यादेइतक्या लोकांना उपस्थित राहण्याची अनुमती दिली आहे.

****

मराठवाड्यात काल १ हजार ९१५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ५४०, नांदेड जिल्ह्यात ४२१, लातूर ४५३, उस्मानाबाद १८६, जालना १००, परभणी ११४, बीड ६४, तर हिंगोली जिल्ह्यात काल ३७ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

दिल्ली इथं यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील जैवविविधता आणि जैव मानकंयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, प्रजासत्ताक दिन सोहळा यावर्षीपासून २३ जानेवारीला सुरु होणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत हा सोहळा २४ जानेवारीपासून सुरु होत असे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...