Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25
May 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे
२०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत पंतप्रधान
कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ज्या पध्दतीनं दोन हजार चौदा पासून २०१९ पर्यंत
काम केलं, त्याचं पद्धतीनं पुढे आपण सोबत काम करू, असं मोदी यांनी वेळी म्हणाले. लोकांच्या
अपेक्षांमुळें कामाची उर्जा मिळाली, सरकारच्या कामांमळे लोकांचा विश्वास वाढल्याचा
ते म्हणाले. त्याच बरोबर सांघिक कामामुळे कामाचा
वेग वाढला असून कर्मचाऱ्यांच्या सूचनामुळे कामाला दिशा मिळाली असंल्याचं पंतप्रधान
मोदी यांनी यावेळी नमूद केलं.
****
केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठीच्या
हालचालींना वेग आला आहे. भाजप संसदीय समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होत असून
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची नेतेपदी औपचारिक घोषणा करण्यात येईल.
त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या नेतेपदी निवड
करण्यात येईल. मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची काल भेट घेऊन त्यांचा
आणि मंत्रीमंडळाचा राजिनामा दिला. राष्ट्रपतींनी राजिनाम्याचा स्वीकार केला तसंच पंतप्रधानांना
व त्यांच्या मंत्रीमंडळाला नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू म्हणून काम करण्यास
सांगितलं. तत्पूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत तीन जून रोजी कार्यकाळ संपत असल्यामुळं
पंतप्रधान मोदी यांनी सोळाव्या लोकसभेच्या विसर्जनाची शिफारस केली होती.
****
दरम्यान, काँग्रेसनं पक्षाच्या कार्यकारी समितीचीही
आज नवी दिल्लीत बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवावर या बैठकीत पक्षाचे
प्रमुख नेते चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस पक्षाला या सार्वत्रिक
निवडणुकीत केवळ ५२ जागांवरच विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
राहूल गांधी या पराभवाची जबाबदारी म्हणून राजिनामा देण्याचा प्रस्ताव मांडला होता.
त्या प्रस्तावावरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता शक्यता आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईचे आशीर्वाद
घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-प्रणित राष्ट्रीय
लोकशाही आघाडीनं जोरदार यश मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच गुजरातला जाणार आहेत.
त्यानंतर पंतप्रधान मोदी सोमवारी सोमवारी वाराणसीला जाणार आहेत. तिथल्या मतदारांनी
चार लाख ७९ हजार मतांच्या फरकानं त्यांना निवडूण दिल्या बद्दल ते मतदारांचे आभार मानणार
आहेत. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
****
ओडिशामधे एकत्रित झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या
निवडणुकीत मतदारांनी विधानसभेसाठी वेगळ्या पक्षाच्या उमेदवारास तर लोकसभेसाठी दुसऱ्या
पक्षाच्या उमेदवारांस मतदान केले. ओडिशात लोकसभेच्या २१ तर विधानसभेच्या १४७ जागा आहेत.
यापैकी बिजू जनता दल अर्थात बिजदला लोकसभेच्या १२, भाजप आठ आणि काँग्रेसला एक जागा
मिळाली. तर विधानसभेत बिजदने ११२ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले असून भाजपला २३ तर काँग्रेसला
केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागलं. मतदारांच्या दुहेरी भूमिकेमुळं भूवनेश्वरच्या
लोकसभेच्या प्रतिष्ठेच्या जागेवर भाजपच्या माजी सनदी अधिकारी अपराजित सिंग यांना विजय
मिळवणं शक्य झाले आहे.
****
दहशतवादी जाकीर मुसाच्या मृत्यूनंतर काही
अनुचित प्रकार घडू नये म्हणून काश्मीरच्या काही भागात लागू केलेली संचारबंदी तिस-या
दिवशीही सुरू आहे. त्याचबरोबर रेल्वे आणि इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आली आहे. श्रीनगर,
कुलगाम आणि पुलवामा या ठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयं देखील बंद ठेवण्यात आली आहेत.
अन्सार घाझवत अल-हींद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेला जाकीर मुसा परवा सुरक्षा
जवानांसोबतच्या चकमकीत मारला गेल्यानंतर फुटीरवादी संघटना हुरियत कॉन्फरंसनं काश्मीरनं
बंद पुकारला होता.
****
दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना हाती
घेतल्या असल्याचं काल राज्य सरकारकनं मुंबई उच्च न्यायालयाला काल सांगितलं. पाणी टंचाईवर
मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करावी, अशी मागणी
करणाऱ्या एक जनहित याचिकेची सुनावणी दरम्यान राज्यसरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे.
या याचिकेवरची पुढली सुनावणी येत्या आठवड्यात होणार आहे.
****
व्हेनेझुयेलामधे काल पश्चिम भागात एका तुरुंगात झालेल्या चकमकीत २९ कैद्यांचा मृत्यू
झाला तर १९ पोलिस जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात कैदी तुरुंग फोडून पळून जाण्याच्या
प्रयत्नात असताना पोलिस विशेष दलानं ही तुरुंगफोडी थांबवण्यासाठी केलेल्या कारवाईत
ही दुर्घटना झाली आहे. पोलिसांनी पळून जाणाऱ्या कैद्यांना थांबवण्यासाठी केलेल्या गोळीबारात
ही दुर्घटना घडली.
****
गुवाहाटी इथं सुरु असलेल्या भारतीय खुल्या
आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी काल भारतानं १२ सुवर्णपदकांची
कमाई केली. या स्पर्धेत भारतानं एकूण 57 पदकांची कमाई केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment