Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25
May 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्रात नवं सरकार स्थापण्यासाठी भाजप संसदीय समितीची नवी दिल्लीत संसद भवनमधल्या
केंद्रीय कक्षामधे बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नावाची नेतेपदी औपचारिक घोषणा करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रीय
लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेचे
अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व घटक पक्षांचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीसह सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी आज १६ वी लोकसभा विसर्जित केली.
काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत १६ वी लोकसभा बर्खास्त करण्याची राष्ट्रपतींना
शिफारस करण्यात आली होती.सदरची शिफारस मान्य करून राष्ट्रपतींनी १६ व्या लोकसभेचं विसर्जन केल्याचं राष्ट्रपती भवनाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला पक्षाध्यक्ष राहूल
गांधी एकटे जबाबदार नसून ती सामुहिक जबाबदारी
असल्याचं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या नवी दिल्लीत कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. महाराष्ट्रातील
पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
मूख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा आणि त्यांचे सहकारी निवडणूक आयुक्त आशोक लवासा आणि सुशिल चंद्रा यांनी आज राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. या भेटीत त्यांनी राष्ट्रपतींना नवनियुक्त
लोकसभा सदस्यांची यादी सादर केली. लोकसभा
निवडणुका सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल तीनही आयुक्तांचे राष्ट्रपतींनीं अभिनंदन केलं. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका
घेतल्या बद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोग,
त्यांचे सर्व कर्मचारी आणि पोलिसांच्या प्रयत्नांची प्रशंसा
केली. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी निवडणूक प्रक्रीयेत सहभाग घेतलेल्या मतदारांचं कौतुक केलं.
****
गुजरात राज्यातल्या सुरतमधे एका कोचिंग क्लासमधे आग लागून झालेल्या दुर्घटनेतल्या
मृतांचा आकडा २२ पर्यंत गेला आहे. तसंच या दुर्घटनेप्रकरणी स्मार्ट डिझाईन स्टुडिओचा
कोचिंग क्लासचा मालक भार्गव भूतानी याल अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भूतानीसह बांधकाम
व्यावसायिक हर्षल वेंकरिया आणि जग्नेश पग्दल यांच्याविरोधातही सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांसह
इतर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सुरतचे पोलिस आयुक्त सतिश शर्मा
यांनी दिली आहे.
****
आंध्र प्रदेशमधे वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष वाय एस जगन मोहन रेड्डी यांची सर्वानुमते
विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजधानी अमरावतीत आज पक्षाच्या नवनिर्वाचित
१५१ आमदारांच्या बैठकीत जगन रेड्डी यांच्या नेतेपदी निवड करण्याचा ठराव पारित करण्यात
आला. जगन रेड्डी आज हैदराबादमधे राज्यपाल ई एस एल नरसिंहन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा
दावा करणार आहेत.
****
लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसनं पक्षाच्या कार्यकारी
समितीचीही आज नवी दिल्लीत बैठक पार पडली. या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष
राहूल गांधी यांनी राजिनामा देऊ केला. मात्र, समितीनं त्यांचा राजिनामा फेटाळला आहे.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची सविस्तर या कारणीमिमांसा करण्यात आली. तसंच
कार्यकारी समितीनं राहूल यांना पक्ष संघटनेत रचनात्मक बदल करण्यास अधिकृत केलं असल्याची
माहिती पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. ****
बुलडाणा जिल्ह्यात आज तीन वेगवेगळ्या अपघातात
दोन जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मेहकर सिंदखेड राजा मार्गावर रेतीच्या टिप्परनं
धडक दिल्यानं एक शिक्षक जागीच ठार झाला तर दुसऱ्या घटनेत खामगाव जवळ मेटॅडोरच्या धडकेत
आणखी एक दुचाकीस्वार ठार झाला. तिसऱ्या घटनेत खामगाव शहरातील अकोला रस्त्यावर एका वाहनाच्या
धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या
जवळाबाजार इथं आज परभणी-हिंगोली राज्य महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
मुनीर पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाणी प्रश्नासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
सकाळी दहा वाजल्यापासूनच या ठिकाणी गावातील महिला आणि बालकं मोठ्या संख्येने भांडी
घेऊन रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. जवळाबाजार इथं मागील दोन वर्षांपासून या ठिकाणची
वीसगाव पाणी पुरवठा योजना बंद असून या गावातील हातपंप बंद पडले आहेत आणि टँकरची व्यवस्थाही
करण्यात आली नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
//**********//
No comments:
Post a Comment