Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 21
October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यभर विधानसभा निवडणुकीसाठी किरकोळ अपवाद
वगळता उत्साहात मतदान सुरू असून पाच वाजेपर्यंत साधारण ४५ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट
केलं आहे. मराठवाड्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४५ टक्के मतदान झालं होतं. नांदेडमधे
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान झालं आहे. हादगाव विधानसभा मतदार
संघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ६१ टक्के मतदान झालं. औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी
तीन वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झालं असून जालना बीड इथं पन्नास टक्के मतदान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यात एक्कावन्न टक्के मतदान झालं आहे.
नांदेड जिल्ह्यात अठ्ठेचाळीस, परभणी सत्तेचाळीस तर लातुर इथं ४४ टक्के मतदानाची दुपारी
तीन वाजेपर्यंत नोंद झाली आहे. उस्मानाबाद इथं पाच वाजेपर्यंत सत्तावन्न टक्के मतदान
झालं आहे.
भंडारा इथं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६२ टक्के तर
धुळे इथं ४३ टक्के तसंच सातारा इथं पाच वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झालं आहे. मुंबईत
दुपारी तीन वाजेपर्यंत ५० टक्के तर नागपूर दुपारी तीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदानाची
नोंद झाली आहे. पालघर ४४, सांगली ४९ टक्के, बुलडाणा ४६ वर्धा ४४ वाशिम ४४, जळगाव ४०
टक्के, अमरावती ४०, ठाणे ३५, अहमदनगर ४६, नंदुरबार ४८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या जालना, भोकरदन, परतूर, घनसावंगी
आणि बदनापूर मतदार संघात किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. भोकरदन मतदार संघातल्या
नळणी आणि वालसावंगी इथल्या मदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया
तासभर थांबवण्यात आली होती. घनसावंगी मतदारसंघातल्या शिवनगाव इथं दुपारी दीड ते दोन
तास मतदान यंत्र बंद पडलं होतं. बदनापूर मतदार संघातल्या जामखेड इथं एका केंद्रावर
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या गटात मारहाण झाली. यात तिघं जखमी
झाले.
****
औरंगाबाद पश्चिम
मतदारसंघातील कडा कार्यालया मधील मतदान केंद्र क्रमांक 220 वर व्हीव्हीपॅट मशीन बंद
पडल्यानं मतदान प्रक्रिया बंद पडली होती. मात्र दहा मिनिटांतच मतदान मशीन बदलल्यानंतर
मतदान प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली.
****
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील कडा कार्यालया मधील
मतदान केंद्र क्रमांक 220 वर व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडल्यानं मतदान प्रक्रिया बंद पडली
होती. मात्र दहा मिनिटांतच मतदान यंत्र बदलल्यानंतर मतदान प्रक्रियेला पुन्हा सुरुवात
झाली. औरंगाबाद पश्चिम मतदार संघात मतदान सुरू झाल्यानंतर सात व्हीव्हीपॅट यंत्रं बदलली
गेली मात्र त्यामुळे मतदान प्रक्रियेत कुठलाही अडथळा आला नसल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं
आहे. हिंगोली, नांदेड, जळगाव, सांगली इथंही व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडल्याच्या घटना
घडल्या.
****
बीडमधील बालेपीर भागात शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षिरसागर यांचे
कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांत
मतदारांसाठी वाहनांचा उपयोग केल्यावरून वाद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलिस तसंच दोन्ही उमेदवारांनी घटनास्थळी निर्माण झालेला तणाव दूर केल्याचं अधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात
मतदारांना पैसे वाटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात
आले आहेत. आबासाहेब सोनवळ आणि किसन जाधव अशी
त्यांची नावं असून त्यांना निवडणूक भरारी पथकानं अटक केली आहे. त्यांच्याकडे वीस हजार
रुपयांची रोकड तसंच मतदान प्रतिनिधी म्हणून पत्र आणि मतदार यादी सापडली आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील आणि अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये
मारहाण झाल्यानंतर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
****
अहमदनगर विधानसभा
मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथकानं ५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात
वसंत टेकडी भागात वाहनांच्या तपासणी दरम्यान एका वाहनात दोन खोक्यांमध्ये सुमारे दीड
किलो सोनं तर जवळपास सात किलो चांदी, आणि दहा भेटवस्तू आढळल्या.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या करवाडी
इथल्या ग्रामस्थांनी करवाडी तेनांदापूर रस्त्याच्या मागणीसाठी विधानसभेच्या मतदानावरही
बहिष्कार टाकला आहे. या रस्त्यासाठी आंदोलनं
करूनही रस्ता तयार न झाल्यामुळं रस्ता तयार होईपर्यंत मतदानावर बहीष्कार टाकणार असल्याचं
निवेदन ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलं होतं.
इथल्या ग्रामस््थांनी लोकसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरही बहिष्कार
टाकला होता.
****
मुंबईतील आरे कॉलनीत
सुरू मेट्रो शेड प्रकल्पाचं काम थांबवणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट
केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment