Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 07 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०७ जून
२०२० दुपारी १.००
वा.
****
गेल्या २४ तासांत देशात नऊ हजार ९७१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख ४६ हजार ६२८ इतकी झाल्याचं आरोग्य आणि
कुटुंबकल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. त्याबरोबरच कालच्या एका दिवसांत २८७ जणांचा
मृत्यू झाल्यामुळे कोरोना संसर्गाने मरण पावलेल्यांची संख्या सहा हजार ९२९ इतकी झाली
आहे. देशातला हा कोरोनाचा मृत्यूदर दोन पूर्णांक ८० इतका आहे. मात्र, देशभरात रुग्णांचं
बरं होण्याचं प्रमाण ४८ पूर्णांक ३६ टक्के झालं आहे. आतापर्यंत एक लाख १९ हजार २९३
जणांनी कोरोनावर मात केली असून, गेल्या २४ तासांत देशात पाच हजार २२० लोक बरे झाल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशात गेल्या २४ तासांत एक लाख ४२ हजार ६९ कोरोना संशयितांच्या लाळेचे नमुने
तपासण्यात आले. यामुळे देशपातळीवरचा तपासण्यांचा आकडा ४६ लाख ६६ हजार ३८६ वर गेल्याचं
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं आज म्हटलं आहे. या चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी सातत्यानं
प्रयत्न केले जात असून, परिषदेनं आतापर्यंत एकूण सातशे एकोणसाठ प्रयोगशाळांना तपासण्यांची
परवानगी दिली आहे. यात शासनाच्या ५३१ प्रयोगशाळा असून, २२८ खासगी प्रयोगशाळांचा समावेश
असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
६४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण रुग्णसंख्या २ हजार चौदा इतकी झाली आहे.
यापैकी १ हजार एकशे चौऱ्याऐंशी रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ९९ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबादच्या
रुग्णांमध्ये शहरातल्या भावसिंगपुरा, बजाजनगर, वाळूज, हिना नगर, रशीदपुरा,
सातारा परिसर, बौद्ध नगर, मिल कॉर्नर, रोजा बाग, देवदूत कॉलनी, बजाजनगर, देवानगरी,
पदमपुरा, सिडको
एन-नऊ, रेणुका माता मंदिर परिसर,
एन-तीन, सिंधी कॉलनी, मुजीब कॉलनी, रोशन गेट,
नंदीग्राम कॉलनी, गारखेडा, शिवाजी नगर, रवींद्र नगर, टिळकनगर, भीमनगर, जवाहर कॉलनी,
जुना मोंढा, मुकुंदवाडी, संत ज्ञानेश्वर नगर, एन-९, संभाजी कॉलनी एन-६, पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक ९, ठाकरे नगर, भवानी नगर, जटवाडा रोड, नागसेन
कॉलनी,
बायजीपुरा, न्यु हनुमान नगर, न्यु बारी
कॉलनी, कैलास नगर, शहानूर मियाँ दर्गा परिसर आणि
ज्योती नगर या परिसरांमध्ये प्रत्येकी
एकेक
रुग्ण सापडला आहे, तर शिवशंकर
कॉलनी, साई नगर मध्ये
३, तक्षशीला नगर, मोंढा
इथल्या ३, चिश्तिया कॉलनी मधल्या २, पैठण गेट २, आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ ३, आंबेडकर
नगर, एन-सात २, बायजीपुरा २, आंबेडकर चौक, पिसादेवी रोड २, गंगापूर तालुक्यातल्या देवशी
पिंपळगावातले
३ तर, बोरवाडी, खुलताबाद या भागातल्या एका रुग्णाचा समावेश
आहे. या रुग्णांमध्ये २७ महिला आणि ३७ पुरुष आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या मारफळा तांडा, इथं जेसीबी खाली चेंगरून
एकाचा जागीच मृत्यू झाला,
तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री ही घटना घडली. शेतात रात्रीच्या
वेळी जेसीबीच्या साह्यानं पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू असताना शेतात झोपलेल्या आई आणि
आणि मुलाच्या अंगावरुन जेसीबी गेला. यात रुपा राठोड या महिलेचा जागेच मृत्यू
झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी तलवाडा
पोलीस दाखल झाले असून जेसीबी चालक फरार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील
सत्तर दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
त्यासाठी शासनाचे वैद्यकीय आणि इतर सर्वच विभागांतले अधिकारी कर्मचारी झोकून देऊन
काम करत आहेत. या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्हा
व्यापारी महासंघाच्या वतीनं जिल्हा बंदचं
आवाहन करण्यात
आलं होतं. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान
प्रत्येक रविवारी
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठानं, दुकान बंद ठेवण्याचं
आवाहन उस्मानाबाद
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment