Tuesday, 9 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 09 JUNE 2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 ०९ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ७२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात २६ महिला आणि ४६ पुरूष रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता दोन हजार १४१ झाली आहे. आतापर्यंत एक हजार २५३ रुग्ण पूर्ण बरे झाले असून १०८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ७८० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यात काल रात्री नवे २ कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३ जण कोरोना विषाणूने बाधित झाले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांपैकी ६ जण बरे झाले असून सध्या ५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आमच्य वार्ताहरानं कळवलं आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ४८ पूर्णांक ४६ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात या विषाणूबाधितांची संख्या दोन लाख ६६ हजार ५९८ झाली आहे, या पैकी एक लाख २९ हजार २१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
****
राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला कापूस १२ जूनपर्यंत खरेदी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्यशासन आणि पणन विभागाला दिले आहेत. आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि एजंटांवर शासनानं कारवाई करावी, असे आदेशही खंडपीठानं दिले आहेत.
****
नांदेड  इथं  टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूध्द कारवाई करत महापालिकेनं ४२ हजार ६०० रूपये दं रक्कम वसूल केला. दुकानात एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणं, सॅनिटायझरचा वापर न करणं, मास्क न वापरणं आदी कारणांवरून ही कारवाई करण्यात आली.  
****
अभिनेता सोनू सूद याला मुंबईत वांद्रे रेल्वे स्थानकावर स्थलांतरित कामगारांची भेट घेण्यास मनाई करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी सोनू सूदला काल रात्री रेल्वे स्थानकात जाण्यापासून रोखलं, असं मुंबई पोलिसांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...