Sunday, 14 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 14 JUNE 2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 14 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात आजही ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी सकाळी हलक्या सरी कोसळल्या. रभणी शहर आणि परिसरात तासाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. नाशिक परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत चांगली वाढ होत आहे. नांदूर-मध्यमेश्वर धरणातून आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात हजार चारशे छप्पन्न घनफूट प्रतिसेकंद इतक्या वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ११३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार सातशे एकोणचाळीस झाली आहे. यापैकी १ हजार चारशे एकावन्न कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १४३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये आता एक हजार एकशे पंचेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये बायजीपुरा, राजमाता हाऊसिंग सोसायटी, संजय नगर, आकाशवाणी परिसर, सिडको पोलिस स्टेशन परिसर, सिल्क मिल कॉलनी, किराडपुरा, पीरबाजार, शहानूरवाडी, अहिल्या नगर, मुकुंदवाडी, जहाँगीर कॉलनी, हर्सुल, कैलास नगर, समर्थ नगर, गौतम नगर, भाग्य नगर, मंजूरपुरा, मदनी चौक, रांजणगाव, बेगमपुरा, रेहमानिया कॉलनी, काली मस्जिद परिसर, क्रांती चौक परिसर, विश्रांती नगर, देवगिरी नगर, सिडको वाळूज, राम नगर, देवगिरी कॉलनी, स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी, बकवाल नगर, वाळूज, वळदगाव, अज्वा नगर, गणेश नगर, पंढरपूर, वाळूजगाव, ता. गंगापूर, सिल्लोडमधलं शाहू नगर, वैजापूर मधलं मुस्तफा पार्क, या भागातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा, तर राजाबाजार, न्यु हनुमान नगर, खोकडपुरा, बंबाट नगर, बीड बायपास, साईनगर एन ६, रशीदपुरा, यशोधरा कॉलनी, देवगिरी कॉलनी सिडको, साई समृद्धी नगर कमलापूर, गजानान मंदिर परिसर गारखेडा आणि वडगाव कोल्हाटी या भागातल्या प्रत्येकी २ रुग्णांचा, माया नगर एन-२ मधल्या ३ रुग्णांचा, छावणी परिसर, जिल्हा परिषद परिसर, गजानन नगर गल्ली क्रमांक ९, पंढरपूर इथलं फुले नगर या भागातल्या प्रत्येकी ४ रुग्णांचा, गुलमंडी इथल्या ५ रुग्णांचा, पंढरपूर मधल्या सलामपूर इथल्या ११, तर बजाजनगर इथल्या १५ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये अडतीस महिला, तर ७५ पुरूष रुग्ण आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात आज सकाळी आणखी एका कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत एकूण पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १४५ रुग्ण आढळले असून, एकशे चार जणांना उपचारानंतर घरी पावण्यात आलं आहे, तर ३६ रुग्णावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आज सकाळी मृत्यू झालेल्या रुग्णाला सोळा दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याला हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह हे आजारही होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज ७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात मुंबईहून संगमनेर इथं आलेल्या २४ वर्षीय युवतीचा समावेश आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात काल १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता ६० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ जणांचा कोरोना विषाणुसंसर्गामुळे मृत्यू झाला असून, ३१ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या २३ जणांवर उपचार सुरु आहेत.
****
रायगड जिल्ह्यात काल ५७ कोरोना बाधित रुग्ण वाढले असून, जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या आता १ हजार ७०९ झाली आहे. तर काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार दोनशे अडतीस रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या रायगड मध्ये ३९७ रुग्ण उपचार घेत आहेत.
****
नवी मुंबईतल्या वाशी इथं असणाऱ्या सिडको प्रदर्शनी केंद्रात महापालिकेनं १ हजार २०० खाटांचं तात्पुरत्या स्वरूपाचं कोविड रूग्णालय उभारलं आहे. या रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पनवेल इथल्या इंडियाबुल्स या गृहनिर्माण प्रकल्पात सुरू करण्यात आलेले अलगीकरण कक्ष बंद करण्यात आले आहेत.
****
सातारा जिल्ह्यात काल एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. न्यूमोनियाच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा रुग्ण मागच्या महिन्यात मुंबईहून साताऱ्यात आला होता. आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण सातशे सत्तावीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, चारशे नव्व्याण्णव जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...