Monday, 15 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 15 JUNE 2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 १५ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी कोरोना विषाणूचे नवे ५० रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २ हजार ८०६ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या १ हजार १५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. १ हजार ५०२  रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १५० असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. 
****
देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४  झाली आहे. गेल्या चोवीस तासांमधे ११ हजार ५०२  रुग्णांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
देशात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ९ हजार ५२० झाली आहे. गेल्या चोवीस तासांमधे ३२५ मृत्यू झाले आहेत.
****
पेट्रोलच्या दरामधे ४८ पैसे तर डिझेलच्या दरामधे २३ पैशांची वाढ झाली आहे. या दरांमधे वाढ होण्याचा आजचा सलग नववा दिवस आहे.
****
मुंबईमधे आजपासून निवडक उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी हे सेवा सुरू करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
****
भारताच्या वाट्याचं पाकिस्तानमधे वाहून जाणारं तीन नद्यांचं पाणी रोखण्यावर  सरकार काम करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. हे पाणी जम्मू- काश्मीर, पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना दिलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 
****
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांच आज कोल्हापूर इथं निधन झालं.ते ९२ वर्षाचे होते. भारतीय बनावटीच्या पहिल्या रेडिओ दुर्बिणीचे ते जनक होत.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृतदेहाची छायाचित्र विचलित करणारी असल्यानं सामाजिक संपर्क माध्यमातून प्रसारीत करू नये आणि केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.
****
अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे पाच रुग्ण आज आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णांची संख्या तिनशे त्रेचाळीस झाली आहे.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...