Saturday, 19 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे त्र्याण्णव हजार तिनशे सदोतीस रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ५३ लाख आठ हजार १४ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेऊन ४२ लाख आठ हजार ४३१ रुग्ण देशात बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एकोण ऐंशी पूर्णांक २८ शतांश टक्के आहे. सध्या या संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दहा लाख १३ हजार ९६४ आहे.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे एक हजार २४७ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या ८५ हजार ६१९ झाली असून मृत्यू दर एक पूर्णांक ६१ शतांश टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.  

****

कोरोना विषाणुच्या संसर्गानं गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी प्राणवायूची आवश्यकता असल्यानं ही वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतुकीदरम्यान, कोणताही अडथळा येणार नाही याकडे लक्ष द्यावं अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना केली आहे.

****

राज्यसभेतील खासदारांच्या एका शिष्टमंडळानं राज्यात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे. राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे आणि भागवत कराड यांच्या या शिष्टमंडळानं काल नवी दिल्लीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर केलं.  

****

मराठवाड्यात काल सेहेचाळीस कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ६०६ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात या संसर्गामुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३१३ रुग्णांची नोंद झाली.

****

पुण्यात कोरोना विषाणुचे चार हजार ९३ नवे रुग्ण आढळले असून रुग्ण संख्या दोन लाख ४४ हजार ५१६ झाली आहे. जिल्ह्यात या संसर्गामुळे ८५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या पाच हजार ५३६ झाली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...