आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ ऑक्टोबर
२०२० सकाळी ११.००
वाजता
****
मुंबईत सिटी सेंटर मॉलला लागलेली भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
गेल्या १२ तासांपासून अग्निशमन दलाचे सुमारे २५० जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
करत आहेत. दरम्यान, या इमारतीतून ४०० लोकांची सुटका करण्यात आली असून तीन हजार पाचशे
नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. काल रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागल्याचं
वृतसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी सात हजार ५३९ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख २५ हजार १९७ झाली आहे. राज्यभरात काल १९८ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
मराठवाड्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे काल १६ रुग्णांचा मृत्यू झाला,
तर नव्या ५६९ रुग्णांची नोंद झाली आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी चार बाधितांचा
मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात आणखी १०२, तर बीड जिल्ह्यात १२८ रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचे ३७ हजार एकशे चार
रुग्ण आढळले आहेत. सध्या एक हजार पाचशे ४९ रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्ह्यात या
विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ४७ झाली आहे.
****
मुंबईत गेल्या चोवीस तासांत नव्या एक हजार चारशे ६३ कोवि़ड बाधित रुग्णांची
नोंद झाली असून ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबईच्या रुग्णसंखेत वाढ दिसत
असली तरी काल दिवसभरात तब्बल एक हजार दोनशे 89 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुटी देण्यात
आली. आतापर्यंत दोन लाख १६ हजार ५५८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सध्या
एकोणीस हजार चारशे ९१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या वाटूर इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेच्या शाखेची भिंत फोडून चोरट्यांनी सहा लाख ६२ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली
तिजोरी चोरून नेली. बँकेतले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर, प्रिंटर, संगणक, पंखे
आदी साहित्यही चोरट्यांनी चोरून नेलं. या प्रकरणी बँक व्यवस्थापक शिवाजी सावंत यांनी
दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment