आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ मे २०१७
सकाळी १०.०० वाजता
****
राष्ट्रीय
अल्पसंख्याक आयोगातले रिक्त पदे भरण्यासाठी केंद्र सरकारनं पाच सदस्यांच्या समितीची
नियुक्ती केली आहे. उत्तर प्रदेशातले सामाजिक कार्यकर्ते गयारुल हसन या समितीच्या अध्यक्षस्थानी
असतील. या समितीमध्ये प्रथमच जैन धर्मातल्या प्रतिनिधीचाही समावेश करण्यात आल्याचं
अल्पसंख्याक मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या
मोबाईल ॲपचं उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ‘Ambulance.run’ हे आपत्कालिन वैद्यकीय सेवेशी संबधित
ॲप आहे. या ॲपद्वारे वापरकर्ता आपत्कालिन स्थितीमध्ये रुग्णवाहीकेची नोंदणी करु शकतात.
आपल्या जवळील रूग्णवाहिका शोधण्यासाठी, नोंदणी करण्यासाठी आणि सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी
हे ॲप वापरकर्त्याला सहाय्य करेल.
****
राज्यात मत्स्यव्यवसाय उत्पादन वाढीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध
करुन आवश्यक ती मदत केली जाईल, तसंच या व्यवसायाला चालना देण्यासाठी लवकरच मत्स्यव्यवसाय
धोरण तयार करण्यात येईल असं पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि
मत्स्यव्यवसाय
मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं. मुंबई इथं झालेल्या मत्स्यसंवर्धन
प्रशिक्षण आणि कार्यशाळेत ते
काल बोलत होते.
****
विश्व संवाद केंद्राच्या वतीनं दिले जाणारे आद्य वार्ताहर
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार काल औरंगाबाद इथं घोषित करण्यात आले. लातूर इथले
ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, हिंगोली इथले पत्रकार प्रकाश सनपूरकर, अंबड तालुक्यातले
पत्रकार संतोष जिगे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विश्व संवाद केंद्राचे
अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे यांनी काल या पुरस्कारांबाबतची घोषणा केली. या वर्षीपासून
महिला पत्रकारांनाही हा पुरस्कार देण्यात येणार असून यंदाचा पुरस्कार आरती श्यामल जोशी
यांना जाहीर करण्यात आला. वृत्तपत्रांमधून सातत्यानं विविधांगी लेखन करणारे शरद लासूरकर
यांची पत्रलेखकांमधून पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
****
No comments:
Post a Comment