Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 22
MAY 2017
Time - 1.00
to 1.05 pm
Language
– Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २२
मे २०१७ दुपारी १ वा
****
महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर
मुख्य विधेयकासह तीन विधेयकं आज विधानसभेत एकमतानं मंजूर झाली. यासाठी राज्य विधीमंडळाचं
तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. गेले दोन दिवस या विधेयकाचर चर्चा झाली.
त्याला आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं. जीएसटी मुळे महागाई कमी होईल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जगात १०७ पेक्षा जास्त देशात
जीएसटी कायदा लागू असल्याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. विधान परिषदेत कालच हे
विधेयक मंजूर करण्यात आलं होतं.
जीएसटी विधेयक विधीमंडळाच्या
दोन्ही सभागृहात मंजूर केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार
मानले.
****
सहायक प्राध्यापकांसाठी घेतल्या
जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नेटच्या निकालाच्या निकषांत विद्यापीठ अनुदान
आयोगानं बदल केले आहेत. परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सहा टक्के विद्यार्थ्यांना
पात्र ठरवून, त्यांच्या वैधानिक आरक्षणाच्या टक्केवारीनुसार त्यांना परीक्षेत पात्र
ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगानं घेतला आहे. त्यामुळे सर्वच संवर्गाला न्याय
मिळण्याची चिन्हे आहेत. केरळमधील उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानंतर आयोगानं
हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयोगानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पत्र पाठवलं
असून, राज्य पात्रता परीक्षा - सेटसाठीही हा आदेश लागू होईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
२८ मे रोजी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या मालिकेचा हा ३२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार
एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, तसंच माय जी ओ
व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी
तसंच रंगनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे
अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या आत्मक्लेष यात्रेला आजपासून पुणे इथून सुरुवात झाली. या
यात्रेत ते पुणे ते मुंबई पायी प्रवास करणार आहेत. हजारो शेतकरी या यात्रेत सहभागी
झाले आहेत.
****
महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य
करणाऱ्या माथेफिरूस अटक करावी तसंच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बीड जिल्ह्यात
बंद पाळण्यात येत आहे. यास प्रतिसाद मिळाला असून बीड शहर सह जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट
बंद पाळण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहरातल्या काही भागात आंदोलकांनी
काही सुरु असलेल्या दुकानावर दगडफेक देखील केली, यात एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
लातूर महानगरपालिकेत भारतीय जनता
पक्षाचे उमेदवार सुरेश पवार यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत
गोजमगुंडे यांचा दोन मतांनी पराभव केला. पवार यांना ३६, तर गोजमगुंडे यांना ३४ मतं
मिळाली. तर उपमहापौरपदी भाजपचे देविदास काळे यांची निवड झाली आहे. काळे यांना ३६ तर
काँग्रेसचे उमेदवार युनुस मोमीन यांना ३४ मतं मिळाली.
****
लातूर शहराचा पाणीपुरवठा मागच्या
वीस दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. धनेगावच्या मांजरा धरणातून पाणी उपसणाऱ्या तीन
पंपापैकी केवळ एक पंप सुरु असल्याचं त्याद्वारे येणारं पाणी शहराला पुरत नसल्याचं आढळून
आलं आहे. यावर तोडगा म्हणून नागझरी बांधावररुन पाणी आणण्याचा विचार केला जात आहे. मात्र
हे पाणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडून विकत घेतल्यानं, त्यांनी पाणी देण्यास नकार
दिला आहे. या बंधाऱ्यात आज साडेतीन मीटर पाणीसाठा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
जालना जिल्हा पुरवठा विभागानं
जालन्यातल्या आठ रेशन धान्य दुकानदारांना ई - पीओएस मशिन देऊनही तिचा वापर न करणं तसंच
इतर नियम न पाळल्यामुळे या दुकानदारांचं प्राधिकार पत्र निलंबित केलं आहे. लाभार्थींना
ई - पीओएस मशिनद्वारेच धान्य वाटप करण्याचे आदेश विभागानं दिले होते.
****
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या
वतीनं लातूर इथं शेतकऱ्यांसाठी उमेद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़. या कार्यक्रमात
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचं आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या पाल्यांचं
शिक्षण आणि आरोग्यासाठी सहाय्य करण्यात येणार
आहे. याअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या २५ आणि मराठवाड्यातल्या २०० विधवा महिलांचं पुनर्वसन
करण्यात येणार आहे.
****
चीन मध्ये झालेल्या आशियाई कॉन्टिनेन्टल
ब्लिट्स बुद्धीबळ स्पर्धेत महिला गटात भारतीय बुद्धीबळपटू आर वैशालीनं सुवर्ण पदक पटकावलं
आहे. तिच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment