आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ मे २०१७
सकाळी १०.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यांवर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात आर्थिक भागीदारी, व्यापार, गुंतवणूक
यासह अन्य विषयांवर चर्चा होणार आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी
नवीन पद्धत अवलंबण्याची गरज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत
यांनी म्हटलं आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काश्मीरमध्ये दगडफेकीच्या
वाढत्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. घुसखोरी आणि दहशतवाद रोखण्यासाठी पारंपारिक
पद्धतींपेक्षा नवीन
उपाय शोधण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.
****
आरोग्यासाठी सायकलचं महत्त्व पटवून देण्यासाठी वाशिम
इथून निघालेला सायकलस्वारांचा जत्था काल जम्मू इथं पोहोचला. अवघ्या तेरा दिवसात दोन
हजार १५० किलोमीटर अंतर पार करत जम्मूला पोहोचलेल्या या १५ सायकलस्वारांच्या
या समूहात एका महिले सह १६ वर्षाच्या आतल्या
दोन शाळकरी मुलांचाही सहभाग आहे.
****
समृद्धी महामार्ग रद्द झाल्यास विदर्भ, मराठवाडा
आणि उत्तर महाराष्ट्राला नुकसान होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या
७०० किलोमीटर पैकी ६३० किलोमीटर अंतर मोजून झालं असून, यासाठी सुमारे
८० टक्के जनतेचं समर्थन असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी
सर्वांनीच प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं, राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. पिंपरी इथं आयोजित छावा संघटनेच्या अधिवेशनात ते काल
बोलत होते. येत्या सहा जुनला 'संवर्धन रायगडाचे, मत शिवभक्तांचे' ही मोहीम सुरू करण्यात
येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
No comments:
Post a Comment