आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधानसभेच्या २८८ जागा आणि सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीच्या
मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून मतदान शांततेत सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी
सकाळच्या सुमारास पाऊस सुरू असल्यानं, सकाळी नऊ वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी सरासरी सहा
टक्क्यांपर्यंत मतदानाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत अडीच
टक्के मतदान नोंदवलं गेल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात ३ पूर्णांक
४० शतांश टक्के तर नांदेड जिल्ह्यात चार पूर्णाक १४ शतांश टक्के इतकं मतदान झालं मतदान
झालं
****
अनेक जिल्ह्यात मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या.
नांदेड उत्तर मतदारसंघात मतदान केंद्र क्रमांक २१वरचं व्हीव्हीपॅट
यंत्र बंद पडलं होतं. नवीन यंत्र लावण्यात आल्यावर सुमारे एक तास उशीरा मतदान सुरु
झालं.
जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यात पथराड इथंही मतदान यंत्र बंद
पडलं, या ठिकाणी मतदान यंत्रांचा संपूर्ण संच बदलावा लागला, त्यानंतर मतदान सुरू झालं.
सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथंही एका मतदान केंद्रावर मतदान
यंत्राज बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया सुमारे ४५ मिनिटं ठप्प झाली होती.
नाशिक जिल्ह्यातही दोन मतदान केंद्रात किरकोळ बिघाड झाल्यामुळे
मतदानात व्यत्यय आल्याचं वृत्त आहे.
पालघर जिल्ह्यातल्या एका केंद्रावर मतदान यंत्र सुमारे तासभर
बंद असल्याने, काही मतदार, मतदान न करताच घरी परतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं.
****
अमरावती जिल्ह्यात मोर्शी मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी
आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या वाहनावर आज सकाळी गोळीबार झाला. गोळीबारानंतर
ही गाडी पेटवून देण्यात आली. मोर्शी मतदारसंघात धनोरी रस्त्यावर हा हल्ला झाला, या
प्रकरणी पोलिस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात आला
****
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा लोहारा तालुक्यात काल रविवारी रात्रीपासून
सुरू झालेल्या पावसाचा जोर आज सकाळीही कायम होता. मुरूम ते अक्कलकोट रस्त्यावर बेंनितुरा
पुलावर पाणी आल्याने यामार्गावरची वाहतुक थांबवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment