Monday, 21 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –21 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****
ाज्यातील विविध भागात पाऊस पडत असला तरी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र उत्साहात मतदान सुरू आहे. राज्यात अकरा वाजेपर्यंत १७ पूर्णांक २० दशांश टक्के
मतदान झालं आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात १३ पूर्णांक २०, जालना १९ पूर्णांक ७२ टक्के, बीड - तेरा टक्के, उस्मानाबाद ११ टक्के, हिंगोली - १८ पूर्णांक ४८, नांदेड जिल्ह्यात १५ पूर्णांक ३० टक्के मतदान झालं आहे. लातुर इथं सकाळपासून सुरू पावसामुळं अकरा वाजेपर्यंत फक्त चार टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर पाऊस थांबला आणि मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत.  
बुलडाणा इथं पहिल्या चार तासांत पंधरा पूर्णांक ९१ टक्के मतदानाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात १४ पूर्णांक ९२, चंद्रपूर १६ पूर्णांक ८०,  रायगड जिल्ह्यात १७ पूर्णांक ६७, सोलापूर- १३  पूर्णांक ३७ टक्के मतदान सकाळी अकरा वाजेपर्यंत नोंदलं गेलं.
****
राज्यात आज सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर अनेक जेष्ठ नेत्यांनी आणि उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुर इथं सपत्नीक मतदान केलं दरम्यान, प्रत्येकानं आज मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन त्यांनी यावेऴी केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत तर सुप्रिया सुऴे यांनी बारामती इथं  मतदान केलं.  ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, अजीत पवार, सरसंघचालक मोहन भागवत, उदयनराजे भोसले, राम नाईक, हरिभाऊ बागडे, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, सुशीलकुमार शिंदे, शिवेंद्र राजे भोसले, प्रफुल्ल पटेल, सुभाष देशमुख, प्रकाश आंबेडकर, अनिल बोंडे, अर्जुन खोतकर, विजय कुमार गावित, सुरेश खाडे, सदाभाऊ खोत, एकनाथ खडसे, धनंजय मुंडे, गिरीश बापट, मधुकर पिचड, छगन भुजबळ यांनी आपापल्या विधानसभा मतदार संघांत मतदान केलं. सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, राणी बंग तसंच चित्रपट अभिनेते आमीर खान, माधुरी दीक्षित, लारा दत्ता यांनीही मतदानाचा हक्क बजावला. सचिन तेंडुलकरनं मुंबईत पत्नी डॉ. अंजलीसह मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी इथं मतदान केलं. 
****
नांदेड इथं जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जनता हायस्कूल शिवाजीनगर इथं सपत्नीक मतदान केलं. व्ही व्ही पॅट यंत्र पाहून मतदान बरोबर होत असल्याचं समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केलं असल्याचं आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे. लातूर इथं उमेदवार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर तसंच अशोक पाटील निलंगेकर यांनी मतदान केलं. औसा इथं काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार बसवराज पाटील यांनीही मतदान केलं आहे.
औरंगाबाद इथं ठिकठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. दरम्यान, अनेक जिल्ह्यात आज सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. हिंगोली जिल्ह्यातल्या बाभुळगाव इथं मतदान केंद्र क्रमांक ११३ वरचं व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडलं होतं. नवीन यंत्र लावण्यात आल्यावर सुमारे एक तास उशीरा मतदान सुरु झालं. तसचं नांदेड, जळगाव, सांगली इथंही व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडल्यानं मतदान एक तासानं उशिरा सुरु झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या सावंगी इथं मतदान केंद्रावर तृतीयपंथी मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. इथं तृतीयपंथी मतदारांचं ७३ मतदान आहे.
****
पोलिस कर्मचारी आपलं काम पूर्ण जबाबदारीनं पार पाडतात यामुळेच आपला देश प्रगती पथावर असल्याचं गृहमंत्री अमित शाह  यांनी पोलिस स्मृती दिवसाच्या निमित्तानं दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात आज म्हटलं. हा दिवस २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथंल्या हॉट स्प्रिंग्स इथं शहिद होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या स्मृतीत साजरा केला जातो.
****
मुंबई पुणे महामार्गावर आज पहाटे  एका खासगी बसनं उभ्या ट्रकला धडक दिल्यानं झालेल्या झालेल्या अपघातात तीन जण मृत्यूमुखी पडले तर अन्य चौदा जखमी झाले आहेत. कामशेत भागात पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातातील बस मुंबईहून कोल्हापूरकडे जात होती. बसमध्ये ३५ प्रवासी होते. जखमींना तळेगावमधील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं घट्ट पकड मिळवण्यास सुरुवात केली आहे. रांची इथं सुरू या सामन्यात तिसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात आठ बाद १४३ धावा झाल्या होत्या. भारतानं पहिला डाव नऊ बाद ४९७ धावांवर घोषित केला.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी...