Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २८ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
देशभरात संचारबंदी
आणि लॉकडाऊन सुरु असताना जनतेला जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्याचा सामना करावा लागू
नये यासाठी विभागाच्या वतीनं मालगाड्यांच्या फेऱ्या नियमित होत आहेत. गेल्या ४ दिवसात जवळपास एक लाख ६ हजार वाघिणींच्या
माध्यमातून जीवनावश्यक वस्तु सर्व राज्यांमध्ये पाठवण्यात येत आहेत. या सेवांवर नियंत्रण
आणि निगराणीसाठी एक आपत्कालीन यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
****
कोरोना विषाणुच्या
प्रतिबंधासाठी शासनाच्या मोहीमेला सहकार्य म्हणून
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधान मदत कक्षाला आपलं एक महिन्याचं
वेतन देणार आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी
कोविड १९ ही भयंकर आपत्ती असल्याचं नमूद केलं आहे. केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद
आणि रमेश पोखरियाल निशंक यांनीही आपलं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत कक्षाला दिलं
आहे.
****
लॉकडाऊन पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडचणीत सापडलेल्या गरिब जनतेला तसंच
मजुरांना आवश्यक
ती मदत करावी असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब
थोरात यांनी केलं आहे. थोरात यांनी आज संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ
नेते, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
गरीब, रोजंदारी कामगार यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्या लोकांना अन्नधान्याची औषधांची गरज आहे अशा लोकांना घरपोच मदत करावी. ही मदत करताना
सामाजिक अंतराबाबतची खबरदारी घ्यावी, असं आवाहन थोरात
यांनी केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात
३२ जणांना दाखल करण्यात आलं होतं. त्यातल्या २५ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला
आहे तर अद्यापही सात जणांचा अहवाल यायचा आहे.
सध्या सोलापुरात एकही कोरोना बाधित रुग्ण नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद
शंभरकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात
आतापर्यंत २५४ जणांचा होमक्वारंटाइन करण्यात आला असून, यातील ११० जणांना चौदा दिवसांचा
कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं तर उर्वरित १४४ जणांना निगराणीखाली
ठेवण्यात आलं आहे. या सर्वांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे .
****
सांगली जिल्ह्यातल्या २३ तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका कोरोना बाधित
रुग्णावर मिरज इथं शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर
आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेले १७ जण विलगीकरण कक्षात आहेत तर अप्रत्यक्ष संपर्कात आलेले इस्म्लामपूर
मधले १६१ जण त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. एकाच कुटुंबातल्या २४ जणांना कोरोना झाल्याचं
स्पष्ट झाल्यानं सांगली जिल्ह्यात संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत अशी
माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी
काल दिली.
****
सिधुदुर्ग जिल्ह्यातल्या
कुडाळ नगरपंचायतच्या वतीनं काल रात्री स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत रस्ते
आणि बाजारपेठा पाण्याच्या माऱ्याने स्वच्छ करण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं समर्पण परिवार या
संस्थेमार्फत आज रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे.
भोकर इथल्या सेवा समर्पण परिवार या संस्थेनं आयोजित केलेल्या
या शिबीरात दोनशे
रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नाव नोंदणी केली आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबीर चालणार आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी शहरासह तालुक्याच्या
ग्रामीण भागात काल सायंकाळी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे
मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. पाथर्डी तालुक्यातल्या
सोनोशी इथं
अंगावर पत्र्याचं छत पडून एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला
तर दुसऱ्या घटनेत आडगाव इथं अंगावर वीज पडून एका तरुण
शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला.
या जोरदार वादळात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घराचे
पत्रे, भिंती पडून काही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
त्यांना शहरातल्या
उपजिल्हा रुग्णालयात
प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर इथं हलवण्यात आलं आहे.
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याची
मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
****
घाई
गडबडीत लोक सामाजिक सुरक्षेचे नियम पाळत नसून योग्य ते अंतर राखन्याच भान ठेवत नाहीत हे पुन्हा निदर्शनास येत आहे.
*****
***
No comments:
Post a Comment