Monday, 8 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 08 JUNE 2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 ०८ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार ६५ झाली आहे. यापैकी १ हजार २२४ रुग्णांची तब्येत सुधारल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं असून ७३७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत १०४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातील १५ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत. यामध्ये राहाता तालुक्यातील २, संगमनेर ६,  शेवगाव १, कर्जत २, अकोले २, अहमदनगर शहर १, तर पारनेर तालुक्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३६  रुग्ण कोरोना विषाणूमुक्त होऊन घरी परतले आहेत
****
देशात गेल्या चोवीस तासांत ९ हजार ९८३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ लाख ५६ हजार ६११ झाली असून आतापर्यंत १ लाख २४ हजार ९४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख २५ हजार ३८१ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
ओडिशात एक शिकाऊ दोन आसनी विमान कोसळून दोघांचा मृत्यू झाला. मृतापैकी एक शिकाऊ वैमानिक आणि दुसरा प्रशिक्षक असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले. शोपियां जिल्ह्यात आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.  दहशतवाद्यांची किंवा त्यांच्या संघटनेची ओळख पोलिसांनी उघड केलेली नाही, असं पीटीआयच्या बातमीत सांगितलं आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस येत्या ११ तारखेला मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता असल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...