Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 08 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०८ जून
२०२० दुपारी १.००
वा.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या २ हजार ६५ झाली आहे. यापैकी १ हजार
२२४ रुग्णांची तब्येत सुधारल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं असून ७३७ रुग्णांवर उपचार
सुरू आहे. आतापर्यंत १०४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
आज सकाळी जिल्ह्यात ४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली, यामध्ये औरंगाबाद शहरातल्या
पीर बाजार इथं ८, सिडको एन-9 संत ज्ञानेश्वर नगर इथं ५, सातारा परिसरात ३, चिकलठाणा,
सादाफ कॉलनी, कटकट गेट, विद्या निकेतन कॉलनी आणि अन्य भागात प्रत्येकी २, शिवशंकर कॉलनी,
बौद्ध नगर, पोलिस क्वार्टर, तिसगाव, भोईवाडा, मिलकॉर्नर, पद्मपुरा, फाजलपुरा, मोहनलाल
नगर, सिडको एन-नऊ रेणुका माता मंदिर, न्यू हनुमान नगर, गारखेडा, मजनू हिल, दमडी मोहल्ला,
ज्युबली पार्क, गारखेडा परिसर, जवाहर कॉलनी, पुंडलिक नगर, भोईवाडा, शिवाजी नगर, गारखेडा,
सेंट्रल नाका, बायजीपुरा, एन-चार सिडको, कैलास नगर, आणि गणेश नगर, या भागात प्रत्येकी
एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात पंढरपूर, देवशी पिंपळगाव, गंगापूर, सावरखेडा, आणि सोयगाव
इथंही प्रत्येकी १ रुग्ण आढळल्याचं वृत्त आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात कोरोनाविषाणू संसर्गामुळे एका ५५ वर्षाच्या महिलेचा आज मृत्यू झाला. ही महिला
गुलजार बाग भागातली रहिवासी होती. जिल्ह्यात आतापर्यंत ९ रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू
झाला असून, सध्या ५२ रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाविषाणू
बाधित रुग्णांची संख्या १९२ असून १३१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
****
अहमदनगर
जिल्ह्यातील १५ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत. यामध्ये राहाता तालुक्यातील २,
संगमनेर ६, शेवगाव १, कर्जत २, अकोले २, अहमदनगर
शहर १, तर पारनेर तालुक्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३६ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त होऊन घरी परतले आहेत
****
केंद्रीय
राखीव पोलीस दलातल्या ४० वर्षीय पोलिसाचा कोरोनाविषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.
हा पोलीस दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग इथं कार्यरत होता.
****
देशात
गेल्या चोवीस तासांत ९ हजार ९८३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे
देशातील एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ लाख ५६ हजार ६११ झाली असून आतापर्यंत
१ लाख २४ हजार ९४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख २५ हजार ३८१ रुग्णांवर रुग्णालयात
उपचार सुरू आहेत.
****
खासगी
प्रयोगशाळातल्या कोरोना विषाणू चाचण्यांचे दर आठवडाभरात कमी होण्याची शक्यता निर्माण
झाली आहे. या प्रयोगशाळातल्या चाचण्यांच्या दर निश्चितीसाठी सरकारने चार सदस्यीय समिती
स्थापन केली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय आयुर्विज्ञान
संशोधन परिषद - आयसीएमआरने आरटी-पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या ४४ शासकीय आणि ३६
खासगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणीची मान्यता दिली आहे.
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना
विषाणू संसर्ग चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. आयसीएमआरनं या प्रयोगशाळेला मान्यता
दिली आहे
****
टाळेबंदी
शिथिलतेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. राज्यात मुंबई महानगर क्षेत्र,
पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपुरात
सरकारा कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची परवानगी राज्य सरकारने
दिली आहे. याशिवाय खासगी कार्यालयांमध्येही १० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची
परवानगी देण्यात आली आहे. शंभर पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या खासगी कार्यालयांना किमान
१० कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवता येईल. दरम्यान, देशभरात आजपासून धार्मिक स्थळं,
मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात धार्मिक
स्थळांसह ही सर्व ठिकाणं सध्या बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
****
बीड
जिल्ह्यात परळी इथं, तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहराजवळ खाणीत कपडे धुण्यासाठी
गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीसह तिची एक बहीण आणि एका भावाचा मृतांमध्ये समावेश आहे.
लहान भावाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला असता त्याला वाचवण्यासाठी दोघी बहिणी पाण्यात
उतरल्या, मात्र यात तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना
जिल्ह्यातल्या अंबड इथले माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचं आज निधन झालं. ते ९५ वर्षांचे
होते.
****
No comments:
Post a Comment