Thursday, 22 September 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.09.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ सप्टेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

कृषी मंत्रालयानं यावर्षीच्या खरीप पिकांसाठीचा पहिला अंदाज काल जाहीर केला.२०२२-२३ या खरीप हंगामात एकंदर १४ कोटी ९९ लाख २० हजार टन एवढ्या अन्नधान्याचं उत्पादन होण्याचा अंदाज असल्याचं कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी सांगितलं.

****

भारत समजून घ्यायचा असेल, तर भारतातली प्राचीन संस्कृती, इतिहास, वैदिक परंपरा, संगीत, आयुर्वेद या क्षेत्रातली एकसूत्रता समजून घेणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होत्या. सितारामन यांच्या हस्ते, "भारत विद्या" या ऑनलाइन शैक्षणिक पोर्टलचं यावेळी अनावरण करण्यात आलं.

****

केंद्रीय तपास यंत्रणा - सीबीआयनं २२ हजार ८४२ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी जहाज बांधणी क्षेत्रातल्या एबीजी शिपयार्ड कंपनीचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना अटक केली आहे. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक यासह एकूण २८ बँकांच्या समुहाकडून घेतलेल्या कर्जाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

****

महसूल गुप्तचर संचलनालयानं ३३ कोटींहून अधिक रकमेच्या सोन्याच्या वीटा जप्त केल्या आहेत. मुंबई, दिल्ली आणि पाटण्यात ही कारवाई करण्यात आली. ईशान्येकडच्या देशांमधून यांची तस्करी सुरू होती.

****

आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या दोनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या वतीनं, औरंगाबाद, नांदेड आणि बीड मध्ये महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

सेवा पंधरवाड्याची यशस्वी अंमलबजावणी करावी असे निर्देश औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. औरंगाबाद विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीसह विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला.

****

मराठवाड्यात काल ५२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १५ रुग्णांचा समावेश आहे.

//*********//

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...