Monday, 20 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२० फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आजपासून वाढवण्यात आली आहे. आजपासून बचत खात्यातून आठवड्याला ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २४ हजार इतकी होती. १३ मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व बंधनं मागे घेण्यात येणार आहेत.

****

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संथ गतीनं होत असलेल्या तपासाचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे समता विचार मंच यांच्यावतीनं निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत डॉ एन डी पाटील यांच्यासह अनेक लेखक, कार्यकर्ते तसंच पानसरे कुटुंबीय या मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झाले.

औरंगाबाद इथंही निर्भय मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून या हत्येच्या संथ तपासकार्याचा निषेध करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातून निघालेला हा मोर्चा पाणचक्की, घाटी परिसर मार्गे भडकल गेट भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभेत विसर्जित झाला. कॉम्रेड डॉ भालचंद्र कांगो, प्राध्यापक शिरीष तांबे यांच्यासह मान्यवरांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. नागरिक मोठ्या संख्येनं या निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झाले होते.

****

नाशिकमध्ये कांद्याच्या देशांतर्गत वाहतुकीसाठी रेल्वे मंत्रालयानं आणखी एक विशेष मालगाडी सूरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पासून ही रेल्वे उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून कांदा सध्या पूर्व, उत्तर, ईशान्य आणि पूर्वेकडील किनारी भागात पाठवला जात आहे.

****

नगर तालुक्यातल्या पांगरमल इथली घटना ताजी असतानाच पुन्हा कौडगाव इथं विना परवाना हॉटेलमध्ये बनावट मद्य पिल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. पांगरमल इथल्या घटनेत मृतांची संख्या आठ झाली असून, याप्रकरणी तपास सुरु आहे. 

//********//




No comments: