आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२४ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
देशभरात
आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महाशिवरात्रीच्या
शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठवाड्यातल्या
घृष्णेश्वर आणि औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंग क्षेत्रावर भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासून
रांगा लावल्याचं दिसून येत आहे. औरंगाबाद शहरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं असून, शहरातल्या महादेव मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत.
****
जागतिक बँकेनं जाहिर केलेल्या अहवालामध्ये दिलेल्या प्रमाणानुसार
आपापल्या कामांचा आढावा घेण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय सचिव
आणि राज्यांच्या प्रमुख सचिवांना दिले आहेत. तसंच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांना दर
आठवड्याला प्रगतिचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. प्रगति प्रणालीच्या माध्यमातून सर्व
अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजनांचा
आढावा घेऊन, २०२२ पर्यंत सर्वांना घर या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. राज्यांनी आपली
ध्येय पूर्ण करण्यासाठी आखलेलं धोरण, त्यासाठीच्या योजना आणि केलेली कारवाई तसंच परिक्षण
यंत्रणा सादर करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.
****
जिल्हा परिषद निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात
पुरेशा जागा निवडून न आल्यानं शिवसेनेचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास राज्य मंत्री
दादा भुसे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा पक्षाचे नेते
उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात
जागांपैकी अवघ्या दोन जागा तर पंचायत समितीच्या १४ जागांपैकी सहा जागांवरच शिवसेनेचे
उमेदवार निवडून आल्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत दादा भुसे यांनी राजीनामा
दिला.
****
तरेहरान इथं सुरु असलेल्या महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धैत
भारतीय ग्रँडमास्टर हरिका द्रोणावलीनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. उपउपान्त्य
फेरीत हरिकानं जॉर्जियाच्या नाना जाग्निजे हीचा पराभव केला. हरिकानं सलग तिसर्यांदा
विश्वचषक स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात प्रवेश केला आहे. या फेरीत तीचा सामना चीनच्या
खेळाडूसोबत होणार आहे.
//****//
No comments:
Post a Comment