Thursday, 23 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२३ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राज्यात दोन टप्प्यात पार पडलेल्या, दहा महानगरपालिका, २५ जिल्हा परीषदां, आणि २८३ पंचायत समित्यांच्या मतदानाच्या मतमोजणीला काहीवेळापूर्वीच सुरुवात झाली आहे.

१० महापालिकांच्या, एक हजार, २६८ जागांसाठी तब्बल ९ हजार, २०८ उमेदवार रिंगणात होते. २५ जिल्हा परिषदांची निवडणूक सात हजार, २३४ उमेदवारांनी लढवली होती. २८३ पंचायत समित्यांच्या तीन हजार जागांसाठी, १२ हजार, ८६० उमेदवार मैदानात होते. मराठवाड्यातल्या आठ जिल्हा परिषदांचे ४६० गट, आणि ७६ पंचायत समित्यांच्या ९३० गणांतल्या मतदानाचीही आज मतमोजणी केली जाणार आहे.

पंचायत समितीनिहाय मतदानाची मोजणी केली जाणार असून, दुपारपर्यंत सर्व  निकाल हाती येण्याची शक्यता आहे. अपवाद वगळता सर्व ठिकाणी बहुरंगी लढती झाल्यानं, त्याचबरोबर मतदानाचं प्रमाणही वाढल्यानं निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

****

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यात १२ जिल्ह्यात ५३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी साडे नऊ टक्के मतदान नोंदवलं गेलं.

****

जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी काल रात्री गस्तीवर असलेल्या जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले असून, चार जवान जखमी आहेत. या गोळीबारात एक स्थानिक महिलाही ठार झाली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या भागात सैन्याकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.

****

लातूर इथं शासनाच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्रावर वजन काटे वाढवून शेतकऱ्यांची आलेली तूर तातडीनं खरेदी करावी अशी मागणी लातूरचे माजी आमदार पाशा पटेल यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तूर खरेदी बंद आहे, या पार्श्वभूमीवर पाशा पटेल यांनी बाजार समितीला, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून खरेदी केंद्र वाढवावीत, तसंच खरेदी केंद्रावर वजनकाटे वाढवावेत, अशी विनंती केली आहे.

//*****//







     

No comments: