Saturday, 25 February 2017

आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२५ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

      देशात २०१६ या वर्षात थेट परदेशी गुंतवणुकीत १८ टक्क्यांनी वाढ होऊन ती ४६ अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे. औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग - डीआयपीपीनं ही माहिती दिली. सेवा, दूरसंवाद, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर तसंच वाहननिर्मिती या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड आणि जपान या देशातून सर्वात जास्त गुंतवणूक झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 

****

भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असून जागतिक अर्थकारणाच्या चढउताराचे भारतावर फार विपरित परिणाम होणार नाही, असं मत काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं व्यक्त केलं. गेल्या दोन वर्षात भारतानं आर्थिक क्षेत्रात जी कामगिरी बजावली आहे, ती निश्चितच गौरवास्पद आहे, असं नाणेनिधीच्या आशिया पॅसिफिक विभागाचे सहाय्यक संचालक पॉल कॅसिन यांनी काल वॉशिंग्टन इथं पीटीआयशी बोलतांना सांगितलं.

****

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात काल काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोन्हीही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चतुःशृंगी पोलीस स्थानकात जाऊन एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अभाविप मुर्दाबाद, अशा आशयाची भित्तीपत्रकं आवारात लावण्यात आल्यामुळे हा तणाव निर्माण झाला आहे.

****

परभणी महानगरपालिकेच्या २०१७-१८ च्या १७ कोटी ७६ लाख रूपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला काल स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात १०२ कोटी १४ लाख रूपयमहसुली खर्च, तसंच १३५ कोटी ६४ लाख रूपये भांडवली खर्च प्रस्तावित आहे.

****

गडचिरोली इथं आजपासून दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजता ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

//*****//

No comments: