आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Friday, 30 November 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.11.2018....Evening Bulletin
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
राज्यातल्या
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे ५०० कोटी रुपये निधीचा
प्रस्ताव पाठवला असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं.
या निधीव्यतिरिक्त राज्य सरकारनं पुरवणी मागण्यांमध्ये दोन हजार २०० कोटी रुपयांची
तरतूद केल्याचं ते म्हणाले. सभागृहात दुष्काळासंबंधी चर्चेला ते उत्तर देत होते. दुष्काळ
घोषित करण्यासंबंधी केंद्र सरकारचे नियम चुकीचे असल्याचा आरोप विरोधी पक्ष सदस्यांनी
केला. त्यावर बोलताना पाटील यांनी, केंद्राच्या निकषाव्यतिरिक्त राज्य सरकारनंही वेगळे
निकष तयार करुन जास्त मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याचं सांगितलं. राज्यात ज्या भागात
दुष्काळ जाहीर केला, त्या भागातला विद्यार्थी राज्यात कुठेही शिक्षण घेत असला तरी त्याला
शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सरकारनं
विद्यार्थ्यांचं निम्मं शुल्क याआधीच भरलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं. दुष्काळामुळे
काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून, दुष्काळी कालावधीतल्या पिण्याच्या
पाण्याच्या योजनांचं विजेचं बील सरकार भरणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जनावरांसाठी
चारा छावणीबाबतीतही सरकारनं नियोजन केल्याचं ते म्हणाले.
****
राज्यात
अवैध वाळू तस्करी प्रकरणी कडक कारवाई करण्यात येते असून, अवैध वाळू रोखण्यासाठी प्रयत्न
केले जातील, असंही पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. जालना जिल्ह्याच्या अंबड
तालुक्यातल्या मौजे इंदलगाव इथल्या जप्त वाळूसाठा प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची
विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असं ते म्हणाले. सदस्य विनायक मेटे यांनी
याबाबतची लक्षवेधी मांडली होती.
****
राज्यातल्या
आजी, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी, योजनांच्या अंमलबजावणीसाठी तसंच त्यांच्या सन्मानासाठी
शासन कटिबद्ध आहे, असं माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज विधान
परिषदेत सांगितलं. सदस्य सतेज पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.
युद्धात धारातीर्थ पडलेल्या सैनिकांना देण्यात येणारी रक्कम वाढवून २५ लाख करण्यात
आली असून, ही रक्कम ४८ तासांच्या आत सन्मानानं परिवारास सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात
आले, त्याचप्रमाणे वीर पत्नी विधवांना मिळणारी तीन हजार रुपयांची पेंशन वाढवून सहा
हजार करण्यात येणार असल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं.
****
बाळासाहेब
ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत राज्यात रस्त्यांमधल्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या
आणि तत्काळ वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या व्यक्तीस तात्काळ उपचार उपलब्ध करुन
देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधान
परिषदेत दिली. अशा रुग्णांना ७४ उपचारांच्या वैद्यकीय सेवा नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून
पहिल्या ७२ तासांसाठी देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
****
शाळांच्या
पटपडताळणी मोहिमेमध्ये बोगस पटसंख्या दाखवून गैरप्रकार केलेल्या शाळांवर येत्या दोन
महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत
सांगितलं. राज्यातल्या शाळांमध्ये ‘सरल’ प्रणालीद्वारे सर्व विद्यार्थ्यांची माहिती
आधार क्रमांकाशी जोडणी करुन भरण्यात येत आहे. त्यामुळे बोगस पटसंख्या दाखविण्यास वाव
राहिलेला नाही, असं ते म्हणाले. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजच्या कामकाजानंतर संस्थगीत
करण्यात आलं. पुढील अधिवेशन १८ फेब्रुवारी २०१९ला सुरू होणार आहे.
****
मराठा
समाजाला १६ टक्के आरक्षण लागू झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर ऑल इंडीया मजलीस ए इत्तेहादूल
मुसलमीन - एआयएमएम पक्ष मुस्लीम आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद
मागणार आहे. पूर्वीच्या काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठा समाजाला १६ टक्के
आरक्षण देतानाच मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण जाहीर केलं होतं. एआयएमएमचे आमदार इम्तीयाज
जलील यांनी विधीमंडळ परिसरात आज पत्रकारांना ही माहिती दिली. आपला पक्ष मराठा समाजाच्या
आरक्षणाविरुद्ध नाही पण मुस्लिमांना सुद्धा हा निकष लागू केला पाहिजे, असं ते म्हणाले.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या कळमनुरी इथले अतिरिक्त विस्तार अधिकारी बालाजी गोरे याना दहा हजार रुपयांची
लाच स्वीकारताना आज अटक करण्यात आली. घरकूल योजनेच्या यादीत लाभार्थीचं नाव समाविष्ट
करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
राज्यात
सर्वत्र गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, परभणी जिल्ह्यात
तीन दिवसांत ४६ हजार २०१ बालकांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं
दिली आहे. लसीकरणानंतर एकाही बालकावर गंभीर दुष्परिणाम झाला नसून, पालकांनी आफवांवर
विश्वास न ठेवण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.
****
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 November 2018
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۰ ؍ نومبر ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
مراٹھا سماج کو تعلیم اور ملازمتوں میں16؍ فیصد ریزر ویش دینے کی گنجائش والا بل کل مجلس مقننہ کے دو نوں ایوا نوں میں اتفا ق رائے سے بغیر بحث کے منظور کیا گیا۔ اِس بل کے ذریعے مراٹھا سماج کو سماجی اور معاشی طور پر پسما ندہ طبقہSEBCزمرے میں شامل کیا گیا ۔ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کل یہ بل دو نوں ایوانوں میں پیش کیا تھا۔ اِس بل کی تمام سیا سی جماعتوں نے حما یت کی اور منظور ی دی۔ اِس بل کے اتفاق ِ رائے سے منظور کیئے جانے پر وزیر اعلیٰ نے تمام سیا سی جماعتوں کو مبا رک باد دی اور اُن کے تئیں احسان مندی کا اظہار کیا۔ اِس بل میں ریاست کے تعلیمی اداروں میں داخلوں کے علا وہ ریاستی خد مات عامّہ کمیشن کے تحت تقرارات میں ریزر ویش کی گنجائش رکھی گئی ہے۔ بل میں سیا سی ریزر ویشن کو شامل نہیں کیا گیا ۔
مراٹھا سماج کو ریزر ویشن دینے والے بل کو اسمبلی میں منظور کیئے جانے کے بعد ریاست کے مختلف مقا مات پر خوشی کا اظہار کیا گیا۔ بل منظور کیئے جانے پر تمام جماعتوں کے کار کنان نے مٹھائی تقسیم کر کے اور آتشبازی کے ذریعے خوشی منائی۔ سبھی جماعتوں کے سر کر دہ قائدین نے اِس بل کی منطور ی پر حکو مت کو مبا رکباد پیش کی۔ بی جے پی کے ریا ستی صدر رائو صاحب دانوے نے کل اورنگ آباد میں صحیفہ نگاروں سے بات کر تے ہوئے کہا کہ بی جے پی نے مراٹھا سماج سے کیئے گئے اپنے وعدے کی تکمیل کی ہے۔ ہمارے نامہ نگار نے اطلاع دی ہے کہ جالنہ ، لاتور ،عثمان آباد ، پر بھنی اور دھو لیہ میں آتشبازی اور مٹھائی تقسیم کر کے خوشی کا اظہار کیا گیا۔
***** ***** *****
وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کہا ہے کہ قبائلی سماج کو دیئے گئے ریزر ویشن میں رد و بدل کیئے بغیر دھنگر سماج کو ریزر ویشن دینے کی مرکزی حکو مت سے سفا رش کی جائے گی۔ وہ کل قا نون ساز کونسل میں سوال جواب کے وقفے کے دوران مخا طب تھے۔ وزیر اعلیٰ نے بتا یا کہ ریاست میں دھنگر سماج کو فی الحال قبائلی سماج کے زمرے کے تحت ریزر ویشن حاصل ہے۔ تاہم اُنھیں درج فہرست ذاتوں کے زمرے کے تحت ریزر ویشن دینے کی غرض سے Tata Institute of Scocial Science کی رپورٹ میں پیش کی گئی سفا رشات مرکزی حکو مت کو روانہ کر نے
کی کار وائی آخری مرحلے میں ہے۔ اُنھوں نے کہا کہ آئین کی دفعات کی تکمیل بھی ضروری ہے۔
***** ***** *****
مرکزی وزیر ما لیات ارن جیٹلی مالی سال2019-20 کا مرکزی بجٹ آئندہ یکم فر وری کو پا ر لیمنٹ میں پیش کر یں گے۔ وزارت مالیات نے بتا یا کہ بجٹ کی تیاری کا کام جا ری ہے۔ اِس خصوص میں دی گئی خبروں میں بجٹ کی تیاری کے لیے، بجلی ، فولاد، گھروں کی تعمیر اور شہری تر قیات کی وزا رتوں کی جانب سے اجلاس منعقد کیئے جانے کی اطلاع ہے۔
***** ***** *****
Date: 30 November 2018
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۰ ؍ نومبر ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
مراٹھا سماج کو تعلیم اور ملازمتوں میں16؍ فیصد ریزر ویش دینے کی گنجائش والا بل کل مجلس مقننہ کے دو نوں ایوا نوں میں اتفا ق رائے سے بغیر بحث کے منظور کیا گیا۔ اِس بل کے ذریعے مراٹھا سماج کو سماجی اور معاشی طور پر پسما ندہ طبقہSEBCزمرے میں شامل کیا گیا ۔ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کل یہ بل دو نوں ایوانوں میں پیش کیا تھا۔ اِس بل کی تمام سیا سی جماعتوں نے حما یت کی اور منظور ی دی۔ اِس بل کے اتفاق ِ رائے سے منظور کیئے جانے پر وزیر اعلیٰ نے تمام سیا سی جماعتوں کو مبا رک باد دی اور اُن کے تئیں احسان مندی کا اظہار کیا۔ اِس بل میں ریاست کے تعلیمی اداروں میں داخلوں کے علا وہ ریاستی خد مات عامّہ کمیشن کے تحت تقرارات میں ریزر ویش کی گنجائش رکھی گئی ہے۔ بل میں سیا سی ریزر ویشن کو شامل نہیں کیا گیا ۔
مراٹھا سماج کو ریزر ویشن دینے والے بل کو اسمبلی میں منظور کیئے جانے کے بعد ریاست کے مختلف مقا مات پر خوشی کا اظہار کیا گیا۔ بل منظور کیئے جانے پر تمام جماعتوں کے کار کنان نے مٹھائی تقسیم کر کے اور آتشبازی کے ذریعے خوشی منائی۔ سبھی جماعتوں کے سر کر دہ قائدین نے اِس بل کی منطور ی پر حکو مت کو مبا رکباد پیش کی۔ بی جے پی کے ریا ستی صدر رائو صاحب دانوے نے کل اورنگ آباد میں صحیفہ نگاروں سے بات کر تے ہوئے کہا کہ بی جے پی نے مراٹھا سماج سے کیئے گئے اپنے وعدے کی تکمیل کی ہے۔ ہمارے نامہ نگار نے اطلاع دی ہے کہ جالنہ ، لاتور ،عثمان آباد ، پر بھنی اور دھو لیہ میں آتشبازی اور مٹھائی تقسیم کر کے خوشی کا اظہار کیا گیا۔
***** ***** *****
وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کہا ہے کہ قبائلی سماج کو دیئے گئے ریزر ویشن میں رد و بدل کیئے بغیر دھنگر سماج کو ریزر ویشن دینے کی مرکزی حکو مت سے سفا رش کی جائے گی۔ وہ کل قا نون ساز کونسل میں سوال جواب کے وقفے کے دوران مخا طب تھے۔ وزیر اعلیٰ نے بتا یا کہ ریاست میں دھنگر سماج کو فی الحال قبائلی سماج کے زمرے کے تحت ریزر ویشن حاصل ہے۔ تاہم اُنھیں درج فہرست ذاتوں کے زمرے کے تحت ریزر ویشن دینے کی غرض سے Tata Institute of Scocial Science کی رپورٹ میں پیش کی گئی سفا رشات مرکزی حکو مت کو روانہ کر نے
کی کار وائی آخری مرحلے میں ہے۔ اُنھوں نے کہا کہ آئین کی دفعات کی تکمیل بھی ضروری ہے۔
***** ***** *****
مرکزی وزیر ما لیات ارن جیٹلی مالی سال2019-20 کا مرکزی بجٹ آئندہ یکم فر وری کو پا ر لیمنٹ میں پیش کر یں گے۔ وزارت مالیات نے بتا یا کہ بجٹ کی تیاری کا کام جا ری ہے۔ اِس خصوص میں دی گئی خبروں میں بجٹ کی تیاری کے لیے، بجلی ، فولاد، گھروں کی تعمیر اور شہری تر قیات کی وزا رتوں کی جانب سے اجلاس منعقد کیئے جانے کی اطلاع ہے۔
***** ***** *****
سپریم کورٹ نے25؍ برس سے زائد عمر کے امید وار کو بھی میڈیکل میں داخلے کے لیے اہلیتی امتحان NEET میں شر کت کی اجازت دی ہے۔ یہ فیصلہ ملک بھرمیں آئندہ برس ہو نے والے MBBS اور BDS کور سیس کے اہلیتی امتحان کے لیے نافذ ہو گا۔
***** ***** *****
جائیکواڑی ڈیم کے پانی کے مسئلے پر کل قا نون ساز کونسل میں ہنگامہ آرائی کی گئی۔ رکن کونسل ستیش چو ہان نے الزام عائد کیا کہ مراٹھواڑہ ڈویژن کے حق کا پانی جا ئیکواڑی منصوبے میں چھو ڑ تے وقت حکو مت کی جانب سے مسلسل ناانصافی ہو رہی ہے۔ اُنھوں نے اِس نا انصا فی کو فوری طور پر بند کر نے کا مطالبہ کیا۔ آ بی وسائل کے ریاستی وزیر مملکت وجئے شیو تا رے کے ذریعے دیئے گئے تحریری جواب میں کہا گیا ہے کہ جائیکواڑ ڈیم سے پانی چھوڑ نے اور جائیکواڑی پرو جیکٹ کی دو با رہ منصوبہ بندی کے باعث مراٹھواڑہ ڈویژن کے ساتھ کوئی نا انصا فی نہیں ہوئی۔
تا ہم کو نسل میں جواب سے غیر مطمئین اراکین نے ہنگا مہ آ رائی کی۔
***** ***** *****
سماجی انصاف کے ریاستی وزیر دلیپ کامبلے نے کل قا نون ساز کونسل میں اعلان کیا کہ محکمۂ سماجی انصاف کی اقا مت گاہوں میں طلباء کو وقت پر سہو لیات فراہم نہ کر نے والے افسران پر آئندہ دس یوم میں تحقیقات کر کے منا سب کار وائی کی جائے گی۔ رکن کاونسل ستیش چو ہان نے اورنگ آباد شہر میں محکمے سماجی انصاف کی اقا مت گاہوں کی خستہ حالی اور طلباء کو سہو لیات کی عدم فراہمی کا مسئلہ ایوان میں اُٹھا یا تھا جس پر وزیر موصوف نے یہ اعلان کیا۔
***** ***** *****
قانون ساز اسمبلی کے ڈپٹی اسپیکر عہدے کے لیے بی جے پی ، شیو سینا کے متحدہ امید وار کے طور پر شیو سینا کے وِجئے او ٹی نے جبکہ حزب اختلاف کی جانب سے کانگریس کے ہر ش ور دھن سپکاڑے نے اور آزاد امید وار کے طو رپر بچو کڑو نے امید واری کی در خواست داخل کی ہے۔ ڈپٹی اسپیکر عہدے کے لیے انتخا ب آج ہی ہو گا۔
***** ***** *****
***** ***** *****
جائیکواڑی ڈیم کے پانی کے مسئلے پر کل قا نون ساز کونسل میں ہنگامہ آرائی کی گئی۔ رکن کونسل ستیش چو ہان نے الزام عائد کیا کہ مراٹھواڑہ ڈویژن کے حق کا پانی جا ئیکواڑی منصوبے میں چھو ڑ تے وقت حکو مت کی جانب سے مسلسل ناانصافی ہو رہی ہے۔ اُنھوں نے اِس نا انصا فی کو فوری طور پر بند کر نے کا مطالبہ کیا۔ آ بی وسائل کے ریاستی وزیر مملکت وجئے شیو تا رے کے ذریعے دیئے گئے تحریری جواب میں کہا گیا ہے کہ جائیکواڑ ڈیم سے پانی چھوڑ نے اور جائیکواڑی پرو جیکٹ کی دو با رہ منصوبہ بندی کے باعث مراٹھواڑہ ڈویژن کے ساتھ کوئی نا انصا فی نہیں ہوئی۔
تا ہم کو نسل میں جواب سے غیر مطمئین اراکین نے ہنگا مہ آ رائی کی۔
***** ***** *****
سماجی انصاف کے ریاستی وزیر دلیپ کامبلے نے کل قا نون ساز کونسل میں اعلان کیا کہ محکمۂ سماجی انصاف کی اقا مت گاہوں میں طلباء کو وقت پر سہو لیات فراہم نہ کر نے والے افسران پر آئندہ دس یوم میں تحقیقات کر کے منا سب کار وائی کی جائے گی۔ رکن کاونسل ستیش چو ہان نے اورنگ آباد شہر میں محکمے سماجی انصاف کی اقا مت گاہوں کی خستہ حالی اور طلباء کو سہو لیات کی عدم فراہمی کا مسئلہ ایوان میں اُٹھا یا تھا جس پر وزیر موصوف نے یہ اعلان کیا۔
***** ***** *****
قانون ساز اسمبلی کے ڈپٹی اسپیکر عہدے کے لیے بی جے پی ، شیو سینا کے متحدہ امید وار کے طور پر شیو سینا کے وِجئے او ٹی نے جبکہ حزب اختلاف کی جانب سے کانگریس کے ہر ش ور دھن سپکاڑے نے اور آزاد امید وار کے طو رپر بچو کڑو نے امید واری کی در خواست داخل کی ہے۔ ڈپٹی اسپیکر عہدے کے لیے انتخا ب آج ہی ہو گا۔
***** ***** *****
Thursday, 29 November 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.11.2018....Evening Bulletin
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
विधिमंडळाच्या
दोन्ही सभागृहात आज मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभा पटलावर मांडलं. मराठा समाज आरक्षण विधेयक २०१८ला विरोधी
पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून, तर अजित पवार यांनीही या विधेयकास
एकमतानं मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटलं. या विधेयकात मराठा समाजाला १६ टक्के
आरक्षण देण्यात आलं असून, मराठा समाजाचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास - एस ई बी
सी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात
आरक्षण मिळणार आहे.
त्यानंतर
मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेतही मराठा आरक्षण विधेयक मांडलं. या सभागृहातही चर्चेविना
विधेयक मंजूर करण्यात आलं. विधेयक मंजूर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे
आभार मानले.
विधानपरिषदेत
आज धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पुढच्या अधिवेशनापर्यंत धनगर आरक्षणाचा
प्रश्न मार्गी लाऊ, तसंच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
****
दरम्यान,
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार सर्व वैधानिक प्रक्रिया भाजप सरकारनं मराठा
आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण केली असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं
आहे. ते औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. भाजपनं विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात
दिलेलं वचन पाळलं असून, याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो, असं दानवे म्हणाले.
****
दरम्यान,
मराठा समाज आरक्षण विधेयक मंजूर केल्यामुळे राज्यभरात आनंद साजरा केला जात आहे. भारतीय
जनता पक्षाच्या वतीनं आज औरंगाबाद इथं जल्लोष करण्यात आला. परभणी शहरात मराठा समाज
बांधवांनी आतिषबाजी करुन आनंद साजरा केला, मिठाई वाटप केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. जालना जिल्ह्यात या निर्णयाचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातल्या
सकल मराठा समाजानंही या विधेयकाचं स्वागत केलं.
****
पात्र
माथाडी कामगारांनाच माथाडी कायद्याचा लाभ मिळावा यासाठी माथाडी कामगारांची यादी लवकरच
ऑनलाईन जाहीर करणार असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज
विधान परिषदेत दिली. माथाडी कामगार आणि त्यांच्या प्रश्नाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य
प्रवीण दरेकर यांनी मांडली होती.
****
समाजकल्याण
विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना वेळेवर सोई-सुविधा न देणाऱ्या अधिकाऱ्यांची दहा
दिवासात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप
कांबळे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. औरंगाबाद शहरातल्या समाजकल्याण विभागाच्या
वसतिगृहांची बकाल अवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा
उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून
दिलं होतं.
****
ड्रोन
आणि कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरानं शेतीचा शाश्वत विकास होईल, तसंच शेतकऱ्यांच्या
जीवनमानात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त
केला आहे. मुंबईत आज शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराविषयी आयोजित चर्चासत्रात ते बोलत
होते. ड्रोन आणि कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा
शेती आणि जलसिंचन क्षेत्रासाठी वापर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
वन्य
प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास तसंच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या
अर्थसहाय्यात वाढ करण्यात आल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत
दिली. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आल्याचं ते म्हणाले. वन्य प्राण्यांच्या
हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारं अर्थसहाय्य आता १५ लाख इतकं करण्यात
आलं असून, गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजार भावाप्रमाणे असलेल्या किंमतीच्या
७५ टक्के किंवा ६० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल, असं ते म्हणाले.
****
केंद्र
सरकारनं भाषा संगम नावाचा उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना २२
भारतीय भाषांची माहिती दिली जाणार आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत राबवण्यात येणारा
हा उपक्रम, या महिन्याच्या २२ तारखेपासून सुरु करण्यात आला असून, २१ डिसेंबर पर्यंत
चालणार आहे. विद्यार्थ्यांना भारतीय भाषांची माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये सहिष्णुता
आणि राष्ट्रीय एकतेची भावना वाढीस लागावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
****
पुरुषांच्या
हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज दोन सामने होत आहेत. ओदिशात भुवनेश्वर इथं आयोजित या स्पर्धेत
पहिला सामना अर्जेटिंनाविरुद्ध स्पेन असा आणि संध्याकाळी सात वाजता न्यूझीलंडची लढत
फ्रान्सशी होईल.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2018 13.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय
आयोगानं सादर केलेल्या अहवालावर कृती अहवाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत
सादर केला. या अहवालानंतर विधेयक मांडण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सभागृहाचं कामकाज
स्थगित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. धनगर आरक्षणाबाबतचा
अहवाल केव्हा मांडणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाचा अहवाल कायद्याच्या
अंतर्गत सादर केला असून, धनगर आरक्षणासंदर्भात उपसमिती शिफारशींचा अभ्यास करत असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, विधासनभेत कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराच्या
तासातच विरोधी पक्ष सदस्यांनी, सरकारनं आरक्षणावर स्पष्ट भुमिका घ्यावी, अशी मागणी
केली होती. अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे सरकारनं आरक्षणाच्या मुद्यावर
लक्ष द्यावं, आरक्षणाची टक्केवारी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित
पवार यांनी केली. अधिवेशन संपण्यापूर्वी आरक्षणासंदर्भात विधेयक मांडणार, जर उद्यापर्यंत
विधेयक मांडलं गेलं नाही, तर अधिवेशनाची मुदत वाढवू, असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी दिलं. दरम्यान, भंडारा जिल्ह्यातल्या तुमसा मतदारसंघाचे माजी आमदार, काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते सुभाषचंद्र कारेमोरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव
मांडला. सभागृहानं कारेमोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. कारेमोरे यांचं काल निधन
झालं.
****
देशात आरोग्य सेवेसाठी जीएसटीसारख्या
सांघिक संरचनेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली इथं आज आरोग्याशी संबंधित शिखर बैठकीत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारं
आरोग्य सेवेसाठी वेगवेगळा निधी खर्च करत असल्याचं ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेमुळे
आरोग्य सेवा उपलब्ध करण्याची व्यवस्था आणखी सुधारली असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आर्थिक
वर्ष २०१९-२० चा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर करणार आहेत. अर्थसंकल्प
तयार करण्याचं काम सुरु झालं असल्याचं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. अर्थसंकल्पासाठी
पोलाद, वीज, गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या बैठका झाल्या असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून
आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. मध्यरात्री पाकिस्तानी सैन्यानं सीमेपलिकडून
भारतीय लष्करी चौक्या आणि रहीवाशी भागांना लक्ष्य करत गोळीबार सुरु केला.
****
वस्त्र उद्योगानं निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक
आराखडा तयार करावा, असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी
केलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारतीय वस्त्रोद्योग मंहासंघाच्या जागतिक परिषदेत बोलत
होते. वस्त्रोद्योग क्षेत्राला शक्य ती सर्व मदत पुरवण्याची सरकारची तयारी असल्याचं
ते म्हणाले. या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांचं निर्यातीतलं
योगदान वाढवता येईल, असं ते म्हणाले. भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रानं आपल्या
दृष्टिकोनात आधुनिकता आणावी आणि शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत स्पर्धात्मक लाभ घ्यावा असं
आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री प्रभू यांनी
केलं.
****
तपास यंत्रणाच्या प्रमुखांची दुसरी राष्ट्रीय परिषद आजपासून
नवी दिल्लीत सुरु होत आहे. पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या या
दोन दिवसीय परिषदेत तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, विविध
कायदेशीर बाबी, प्रक्रिया यावर चर्चा होणार आहे. नवीन प्रकारच्या गुन्ह्यांच्या
या युगात पोलीस तपास संस्थांची क्षमता निर्मिती करणं ही या परिषदेची संकल्पना आहे.
राज्य गुन्हे शाखांचे प्रमुख, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष
कृती दलासारख्या राज्य पोलीस तपास संस्था यांच्यासह केंद्रीय अन्वेषण संस्था, राष्ट्रीय
तपास संस्था, सक्तवसुली संचालनालय या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या ८६ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त
अशा एकूण ११० सदस्य पदांच्या पोट निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. उपजिल्हाधिकारी
सुनील यादव यांनी ही माहिती दिली. येत्या दहा डिसेंबरला प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध
होईल, त्यावर १४ तारखेपर्यंत हरकती आणि सूचना दाखल होऊ शकतील आणि १७ डिसेंबर २०१८ला
अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
****
पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज दोन सामने होत
आहेत. ओदिशात भुवनेश्वर इथं आयोजित या स्पर्धेत, आज
संध्याकाळी पाच वाजता अर्जेटिंनाचा सामना स्पेनशी, तर
संध्याकाळी सात वाजता न्यूझीलंडची लढत फ्रान्सशी होईल. काल संध्याकाळी, भारतानं
प्रारंभीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पाच - शून्य अशी सहज मात
करत विजयी सलामी दिली.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2018 11.00AM
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज ‘हायसिस’ या पृथ्वी निरीक्षक अत्याधुनिक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र
प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी नऊ वाजून ५८ मिनिटांनी पीएसएलव्ही
सी ४३ या अवकाशयानाद्वारे आठ
देशांच्या इतर ३० उपग्रहांसह ‘हायसिस’चं प्रक्षेपण करण्यात आलं. इस्रोचं हे सर्वात
दीर्घ प्रक्षेपण असून, हा उपग्रह पाच वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत राहील.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मागसवर्गीय आयोगानं दिलेल्या
अहवालावरच्या ‘कृती अहवालासह’ विधेयक आज राज्य सरकार विधीमंडळात मांडणार आहे. आरक्षण
देताना कुठल्याही कायेदशीर किंवा तांत्रिक त्रुटी राहू नयेत या दृष्टीनं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह अन्य कायदेतज्ज्ञांसोबत
चर्चा केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचीही काल बैठक झाली. आज सकाळी पुन्हा या
समितीची बैठक होत असून, त्यानंतर हे विधेयक विधीमंडळात मांडलं जाईल.
****
लातूर महापालिकेकडून होत असलेली अवाजवी कर आकारणी रद्द करण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या
शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांकडे काल केली. ही
महापालिका ‘ड‘ वर्गातली असूनही सध्या केली जाणारी कर आकारणी ही अधिक असल्याचं व्यापाऱ्यांनी दिलेल्या
निवेदनात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद इथं काल विश्व हिंदु परीषदेतर्फे ‘हुंकार
सभा’ घेण्यात आली. परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक यांनी या सभेला मार्गदर्शन
केलं.
****
एक हजार रुपयांची लाच घेतांना परभणी जिल्ह्यातल्या
केसापुरी इथल्या तलाठी स्वाती घुगेसह अन्य एकाला काल अटक करण्यात आली. तक्रारदाराची
जमीन पत्नीच्या नावे करून नवीन फेरफार करण्यासाठी स्वाती घुगेनं ही लाच मागितली होती.
बीड इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली.
****
पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल भुवनेश्वर
इथं झालेल्या सलामीच्या सामन्यात यजमान भारतानं दक्षिण अफ्रिकेवर पाच -शुन्यनं मात
करून शानदार विजय मिळवला. यात भारताच्या सिमरनजितसिंगनं दोन गोल केले. भारताचा पुढील
सामना बेल्जियम सोबत येत्या दोन डिसेंबरला होणार आहे.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 29 November 2018
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۹ ؍ نومبر ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
مراٹھا ریزر ویشن پر پسماندہ طبقات کمیشن کی رپورٹ سے متعلق کی جانے والی کار وائی کی رپورٹ ریاستی حکو مت آج اسمبلی میں پیش کرے گی۔ریزر ویشن دیتے ہوئے کسی بھی قسم کے قا نو نی یا تکنیکی خا می کو ٹالنے غرض سے وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کل ایڈو کیٹ جنرل آشو تو ش کُمبھ کو نی اور دیگر قا نو نی ما ہرین کے ساتھ تبادلہ خیال کیا۔مراٹھا ریزر ویشن سے متعلق وزرا گروپ کی ذیلی کمیٹی کاا جلاس کل منعقدکیاگیا تھا ، آج صبح دوبارہ مذکورہ کمیٹی کا اجلاس منعقد ہوگا اور بعد میںیہ بل قا نون ساز اسمبلی میں پیش کیا جائے گا۔
وزیر محصول چندر کانت پاٹل نے کل اسمبلی میں بتا یا کہ مراٹھا ریزرویشن سے متعلق بل پراسمبلی کے رواں اجلاس میں مزید غور و خوص کی ضرورت پیش آ نے پر اجلاس کی مدت میں اضا فہ کیا جائے گا۔
***** ***** *****
قا نون ساز کونسل میں کل رات دیر گئے تک ریاست کی قحط زدہ صورتحال پر تبادلہ خیال کیا گیا۔ اِس موقعے پر قحط سے نمٹنے کے لیے مل جل کر اقدامات کر نے کی ضرورت کا اظہار کر تے ہوئے قا نون ساز کونسل میں حزب اختلاف کے رہنما دھننجئے منڈے نے الزام لگا یا کہ حکو مت اِس معاملے میں سنجیدہ نہیں ہے ۔اُنھوںنے قحط سے نمٹنے کے لیے مرکزی حکو مت سے خصو صی امداد منظور کر وانے ،تمام کسا نوں کو مکمل قر ض معا فی دینے اورنجی صنعتوں کی سماجی ذمہ داری کے فنڈ کو حکومت اپنے اختیار میں لے کر اُسے قحط زدہ حالات سے نمٹنے کے لیے استعمال کرنے وغیرہ تجا وزارت ایوان میںپیش کیں۔
دوسری جانب کانگریس پارٹی نے حکو مت پر الزام لگا تے ہوئے کہا کہ ریاست میں دودھ کا کارو بار حکو مت کے غلط منصوبوں اور دودھ کو جی ایس ٹی کے دائرے میں رکھنے کی وجہ سے خسا رے کا شکار ہے۔ کانگریس پارٹی نے مطالبہ کیا کہ حکو مت کسا نوں کے مفادات کو مد نظر رکھتے ہوئے منا سب منصوبے متعارف کر وائیں۔
***** ***** *****
اسمبلی میں پر سوں منظور کیا گیا زرعی پیداوار بازار کمیٹی تر میمی بل حکو مت نے کل قانون ساز کونسل میں واپس لے لیا۔
مارکیٹِنگ کے وزیر سبھاش دیشمکھ نے ایوان کو بتا یا کہ اِس بل پر غور و خوص کر نے کے لیے کسا نوں ، تاجِروں اور ما تھاڑی کے نمائندوں پر مشتمل ایک تحقیقی کمیٹی تشکیل دی جائے گی ۔اور اِس بل میں ترا میم کر کے از سر ِ نو قا نون بنا یا جا ئے گا۔ اِس موقعے پر وزیر موصوف نے مذکورہ بل کی مخالفت میں ریاست بھر کی بازار کمیٹیوں کی جانب سے کیے جا رہے بند کو واپس لینے کی اپیل کی۔اِس فیصلے کا خیر مقدم کر تے ہوئے ما رھاڑی مزدور ایسو سی ایشن کی جا نب سے
کیا جا رہا بند احتجاج کل واپس لے لیا گیا۔
***** ***** *****
Date: 29 November 2018
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۹ ؍ نومبر ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
مراٹھا ریزر ویشن پر پسماندہ طبقات کمیشن کی رپورٹ سے متعلق کی جانے والی کار وائی کی رپورٹ ریاستی حکو مت آج اسمبلی میں پیش کرے گی۔ریزر ویشن دیتے ہوئے کسی بھی قسم کے قا نو نی یا تکنیکی خا می کو ٹالنے غرض سے وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کل ایڈو کیٹ جنرل آشو تو ش کُمبھ کو نی اور دیگر قا نو نی ما ہرین کے ساتھ تبادلہ خیال کیا۔مراٹھا ریزر ویشن سے متعلق وزرا گروپ کی ذیلی کمیٹی کاا جلاس کل منعقدکیاگیا تھا ، آج صبح دوبارہ مذکورہ کمیٹی کا اجلاس منعقد ہوگا اور بعد میںیہ بل قا نون ساز اسمبلی میں پیش کیا جائے گا۔
وزیر محصول چندر کانت پاٹل نے کل اسمبلی میں بتا یا کہ مراٹھا ریزرویشن سے متعلق بل پراسمبلی کے رواں اجلاس میں مزید غور و خوص کی ضرورت پیش آ نے پر اجلاس کی مدت میں اضا فہ کیا جائے گا۔
***** ***** *****
قا نون ساز کونسل میں کل رات دیر گئے تک ریاست کی قحط زدہ صورتحال پر تبادلہ خیال کیا گیا۔ اِس موقعے پر قحط سے نمٹنے کے لیے مل جل کر اقدامات کر نے کی ضرورت کا اظہار کر تے ہوئے قا نون ساز کونسل میں حزب اختلاف کے رہنما دھننجئے منڈے نے الزام لگا یا کہ حکو مت اِس معاملے میں سنجیدہ نہیں ہے ۔اُنھوںنے قحط سے نمٹنے کے لیے مرکزی حکو مت سے خصو صی امداد منظور کر وانے ،تمام کسا نوں کو مکمل قر ض معا فی دینے اورنجی صنعتوں کی سماجی ذمہ داری کے فنڈ کو حکومت اپنے اختیار میں لے کر اُسے قحط زدہ حالات سے نمٹنے کے لیے استعمال کرنے وغیرہ تجا وزارت ایوان میںپیش کیں۔
دوسری جانب کانگریس پارٹی نے حکو مت پر الزام لگا تے ہوئے کہا کہ ریاست میں دودھ کا کارو بار حکو مت کے غلط منصوبوں اور دودھ کو جی ایس ٹی کے دائرے میں رکھنے کی وجہ سے خسا رے کا شکار ہے۔ کانگریس پارٹی نے مطالبہ کیا کہ حکو مت کسا نوں کے مفادات کو مد نظر رکھتے ہوئے منا سب منصوبے متعارف کر وائیں۔
***** ***** *****
اسمبلی میں پر سوں منظور کیا گیا زرعی پیداوار بازار کمیٹی تر میمی بل حکو مت نے کل قانون ساز کونسل میں واپس لے لیا۔
مارکیٹِنگ کے وزیر سبھاش دیشمکھ نے ایوان کو بتا یا کہ اِس بل پر غور و خوص کر نے کے لیے کسا نوں ، تاجِروں اور ما تھاڑی کے نمائندوں پر مشتمل ایک تحقیقی کمیٹی تشکیل دی جائے گی ۔اور اِس بل میں ترا میم کر کے از سر ِ نو قا نون بنا یا جا ئے گا۔ اِس موقعے پر وزیر موصوف نے مذکورہ بل کی مخالفت میں ریاست بھر کی بازار کمیٹیوں کی جانب سے کیے جا رہے بند کو واپس لینے کی اپیل کی۔اِس فیصلے کا خیر مقدم کر تے ہوئے ما رھاڑی مزدور ایسو سی ایشن کی جا نب سے
کیا جا رہا بند احتجاج کل واپس لے لیا گیا۔
***** ***** *****
وزیر تعلیم وِنود تائوڑے نے کل قا نون ساز کونسل کو بتا یا کہ ریاست کے مختلف پرائمری، ثانوی اور اعلیٰ ثانوی اسکولوں میں بر سر خدمت تقریباً 30؍ہزار اساتذہ اورغیر تدریسی عملے کوحکو مت کی جانب سے مالی اِمداد دینے کے لیے آئندہ مالی بجٹ میں مالیاتی فراہمی سے متعلق اقدامات کیئے جائیں گے۔وزیر موصوف نے واضح کیا کہ امداد یافتہ خانگی اسکولوں کے غیر تدریسی عملے سے متعلق تفصیلات اجلاس ختم ہو نے کے بعد اندرون 15؍ یوم کا بینی منظوری کے لیے پیش کیئے جائیں گے۔
***** ***** *****
وزیر صحت ڈاکٹر دیپک ساونت نے سر پرستوں سے اپیل کی ہے کہ وہ افواہوں پر یقین نہ کر تے ہوئے گوبری -روبیلا کی ٹیکہ اندازی مہم میں حصہ لیں۔وزیر موصوف نے بتا یا کہ ٹیکہ اندازی کی اس مہم کے پہلے روز تقریبا10؍ لاکھ 77؍ہزار سے زائد بچوں کو ٹیکے لگائے گئے۔
وزیر موصوف نے کہا کہ اِن ٹیکوں کی وجہ سے کسی بھی قسم کے منفی اثرات یا جسمانی کمزور نہیں ہوتی ہے۔
***** ***** *****
مرکزی حکو مت کی جانب سے کل وزیر اعظم آ واس یو جنا کے تحت شہروں میں 2؍لاکھ 5؍ہزار 442؍ مکانوں کی تعمیر کو منظوری دی گئی۔
اِس میں مہاراشٹر کے لیے ایک لاکھ16؍ہزار42؍ مکا نات شامل ہیں۔منظوری اور نگرانی سے متعلق مرکزی کمیٹی کی کل دہلی میں ہوئی میٹنگ میں یہ منطوری دی گئی۔اِس منظوری کے بعد ریاستی حکو مت کی جانب سے منظور کیئے گئے گھروں کی تعداد بڑھ کر 7؍لاکھ48؍ہزار499؍ ہو گئی ہے۔
***** ***** *****
پر بھنی ضلعے میں کیسا پور کی تلا ٹھی سواتی گھوگے سمیت ایک دیگر فراد کو ایک ہزار روپئے رشوت لیتے ہوئے رنگے ہاتھوں گرفتار کیا گیا۔
شکایت کنندہ کی زمین بیوی کے نام کر کے نئی پھیر پھار کر نے کے لیے سواتی گھو گے نے یہ رشوت کا مطالبہ کیا تھا۔جس پر بیڑ کے محکمہ اِنسداد بد عنوانی نے کار وائی کر تے ہوئے اُسے گرفتار کر لیا۔
***** ***** *****
مہاتما جو تی با پھلے کی بر سی کے موقعے کل ریاست بھر میں اُنھیں خراج عقیدت پیش کیا گیا۔ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کل وِدھان بھون میں مہاتما پھلے کو خراج عقیدت پیش کیا۔اِس موقعے پر اسمبلی اسپیکر ہری بھائو باگڑے اور قانون ساز کونسل کے چیئر مین رام راجے نمبالکربھی موجود تھے۔
اورنگ آ باد کے اورنگ پورہ علاقے میں واقع مہا تما پھلے کے مجمسے پر مختلف سماجی تنظیموں،سیاسی جماعتوں ،میئر نند کُمار گھوڑیلے اور بڑی تعداد میں عوام نے گلہائے عقیدت پیش کیئے ۔
***** ***** *****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2018 07.10AM
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
§
मराठा आरक्षणासंदर्भात मागसवर्गीय आयोगाच्या अहवालावरील ‘कृती
अहवालासह’ विधेयक आज विधीमंडळात सादर होणार.
§
विधान
परिषदेत राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा;
केंद्राकडून विशेष निधी मंजूर करून घेण्याची मागणी
§
कृषी
उत्पन्न बाजार समिती अधिनियम सुधारणा विधेयक मागे; माथाडी कामगारांचं आंदोलन स्थगित
आणि
§
अफवांवर
विश्वास न ठेवता गोवर - रुबेला लसीकरणात सहभाग घेण्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत
यांचं आवाहन.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मागसवर्गीय आयोगानं दिलेल्या अहवालावरच्या ‘कृती अहवालासह’
विधेयक आज राज्य सरकार विधीमंडळात मांडणार आहे. आरक्षण देताना कुठल्याही कायेदशीर किंवा
तांत्रिक त्रुटी राहू नयेत या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाधिवक्ता
आशुतोष कुंभकोणी यांच्यासह अन्य कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ
उपसमितीचीही काल बैठक झाली. आज सकाळी पुन्हा या समितीची बैठक होणार आहे, त्यानंतर हे
विधेयक विधीमंडळात मांडलं जाईल.
दरम्यान,
मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधानसभेच्या या अधिवेशनात अधिक विचार विनिमय करण्यासाठी,
गरज भासल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात येईल, असं महसूल मंत्री आणि सभागृह नेते
चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. राज्य मागासवर्गीय आयोगाचा यासंदर्भातला अहवाल विधीमंडळाच्या पटलावर
मांडावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर पाटील बोलत होते.
****
विधान परिषदेत काल राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर
चर्चा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती. दुष्काळाचा एकत्रितपणे
सामना करण्याची गरज असताना सरकार या प्रश्नाला गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप विधानपरिषदेचे
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं
केंद्राकडून विशेष निधी मंजूर करून घ्यावा, आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,
खाजगी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी सरकारनं ताब्यात घेऊन तो दुष्काळ
निवारणाच्या कामाला वापरावा, असंही मुंडे यांनी सुचवलं. राज्यातला दुध व्यवसाय, सरकारच्या
चुकीच्या धोरणांमुळे आणि दुधाला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत ठेवल्यामुळे डबघाईला
आल्याचा आरोप करत, सरकारनं याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून योग्य धोरण राबवावं,
अशी मागणी काँग्रेस पक्षानं यावेळी केली.
****
नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्यात आल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. हा प्रकल्प रद्द करण्याची
मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी हे नमूद केलं.
****
विधानसभेनं परवा मंजूर केलेलं कृषी उत्पन्न बाजार
समिती अधिनियम सुधारणा विधेयक काल सरकारनं विधान परिषदेत मागे घेतलं. शेतकरी, व्यापारी
आणि माथाडींच्या प्रतिनिधींची एक अभ्यास समिती स्थापन करून या विधेयकाचा अभ्यास केला
जाईल आणि त्यात सुधारणा करून नव्या कायद्यात रूपांतर केलं जाईल, असं पणनमंत्री सुभाष
देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितलं. त्यांनंतर माथाडी कामगार संघटनेचं सुरू असलेलं
बाजार समिती बंदचं आंदोलन मागं घेण्यात आलं.
****
राज्यातल्या
विविध प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या जवळपास
तीस हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शासकीय अनुदानाचा देण्यासाठी आगामी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूद करण्यात येईल, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे
यांनी काल एका निवेदनाद्वारे विधानपरिषदेत सांगितलं. त्याचप्रमाणे खासगी अनुदानित
शाळांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध, अधिवेशन
संपल्यानंतर १५ दिवसात मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर केला जाईल, असंही
त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली
काल शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षक
परिषदेचे अध्यक्ष आदींची बैठक विधानभवनात झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
विदर्भातल्या बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराची चौकशी
निष्पक्ष आणि पारदर्शीपणे सुरू असून, सरकार याप्रकरणी सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा
विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. या
घोटाळ्याला तत्कालीन अधिकारी, मंत्र्यांसह माजी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अजित
पवार जबाबदार असल्याचं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं न्यायालयाला सांगितल्याच्या बातम्या
माध्यमांमध्ये आल्यानंतर, राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष
नेते धनंजय मुंडे यांनी काल सरकारवर टीका केली होती. त्यानंतर महाजन यांनी ही माहिती
दिली. दरम्यान, न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून, या प्रकरणाच्या चौकशीला आपण पूर्ण
सहकार्य करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे.
चार वर्षाच्या खंडानंतर विधानसभेला उपाध्यक्ष प्राप्त होणार आहे. काल या निवडणुकीची
घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज आज दुपारी पावणे बारा वाजेपर्यंत दाखल करता येतील,
त्यानंतर लगेचच या अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.
****
पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता गोवर
- रुबेला लसीकरणात सहभाग घ्यावा असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी केलं
आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी परवा राज्यातल्या सुमारे १० लाख, ७७ हजारांहून
अधिक बालकांना ही लस देण्यात आली. यापैकी सुमारे ५० बालकांना खाज येणे, पुरळ अशी लक्षणं
दिसून आली, मात्र त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या लसीमुळे
कुठलाही विपरीत परिणाम होत नाही तसंच शारीरिक दुर्बलता येत नाही असंही सावंत यांनी
नमूद केलं.
****
केंद्र
सरकारनं काल प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत एकूण २ लाख, ५
हजार ,४४२ घरं बांधण्यास मंजुरी दिली. यामध्ये
महाराष्ट्रासाठीच्या १ लाख, १६ हजार, ४२ घरांचा समावेश आहे. केंद्रीय
मान्यता आणि संनियंत्रण समितीच्या काल
नवी दिल्लीत झालेल्या ४० व्या बैठकीत
ही मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनंतर राज्यात केंद्र सरकारकडून मंजुर करण्यात
आलेल्या घरांची संख्या ७ लाख, ४८ हजार, ४९९ एवढी झाली आहे.
****
महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल
राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात
त्यांना आदरांजली वाहिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद अध्यक्ष रामराजे
निंबाळकर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद इथं औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले यांच्या
पुतळ्याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिक तसंच महापौर नंदकुमार घोडेले
यांनी अभिवादन केलं. बीड शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं महात्मा
फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.
गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिला
मॅरेथॉन स्पर्धा झाली.
*****
***
Wednesday, 28 November 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.11.2018....Evening Bulletin
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधानसभेच्या या अधिवेशनात
अधिक विचार विनिमय करण्यासाठी गरज भासल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात येईल, असं
महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. राज्य
मागास आयोगाचा यासंदर्भातला अहवाल विधीमंडळाच्या पटलावर मांडावा, अशी मागणी विरोधी
पक्षांनी केल्यानंतर पाटील बोलत होते.
****
राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी
शासनानं जाहीर केलेल्या विशेष ज्येष्ठ नागरिक
धोरणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत दिली. वृद्धाश्रमांसाठी आमदार
निधीतून निधी देण्याबाबत आणि ज्येष्ठांच्या विमा योजनांबाबत निर्णय घेणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
विधानसभेनं काल मंजूर केलेलं कृषी उत्पन्न बाजार
समिती अधिनियम सुधारणा विधेयक आज सरकारनं विधान परिषदेत मागं घेतलं. शेतकरी, व्यापारी
आणि माथाडींच्या प्रतिनिधींची एक अभ्यास समिती स्थापन करून या विधेयकाचा अभ्यास केला
जाईल आणि त्यात सुधारणा करून नव्या कायद्यात रूपांतर केलं जाईल, असं पणनमंत्री सुभाष
देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितलं. या विधेयकाच्या विरोधात राज्यभरातल्या बाजार समितींनी
पुकारलेला संप आता मागे घ्यावा, असं आवाहनही देशमुख यांनी केलं. या निर्णयाचं स्वागत
करताना आंदोलक माथाडी संघटनेनं लवकरच हे आंदोलन मागं घेण्यात येईल, अशी माहिती दिली
आहे.
****
विधान परिषदेत आज राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर
चर्चा सुरू आहे. दुष्काळाचा एकत्रितपणे सामना करण्याची गरज असताना सरकार या प्रश्नाला
गांभीर्यानं न घेता विरोधी पक्षांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी
पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. कर्ज माफी योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात
त्रुटी असल्यानं बहुसंख्य शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळत नसल्याचं सांगत, कर्ज
माफीची घोषणा ही फसवी असल्याची टीका मुंडे यांनी केली. दुष्काळाचा सामना करण्यासाठी
राज्यसरकारनं केंद्राकडून विशेष निधी मंजूर करून घ्यावा, आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट
कर्जमाफी द्यावी, खाजगी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी सरकारनं ताब्यात
घेऊन तो दुष्काळनिवारणाच्या कामाला वापरावा, असंही मुंडे यांनी सुचवलं. राज्यातला दुग्ध
व्यवसाय, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि दुधाला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत
ठेवल्यामुळे डबघाईला आल्याचा आरोप करत, सरकारनं याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार
करून योग्य धोरण राबवावं, अशी मागणी काँग्रेस पक्षानं यावेळी केली.
****
विधानसभेच्या
उपाध्यक्षपदासाठी येत्या ३० तारखेला निवडणूक होणार आहे. सर्वाधिक चार वर्षाच्या खंडानंतर
विधानसभेला उपाध्यक्ष प्राप्त होणार असल्याचं आज या निवडणुकीची घोषणा झाल्यानं स्पष्ट
झालं. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरू होत असून अर्जांची छाननी उद्या
होणार असल्याची माहिती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.
****
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त
आज राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात
त्यांना आदरांजली वाहिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद अध्यक्ष रामराजे
निंबाळकर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद इथं औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले यांच्या
पुतळ्याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिक तसंच महापौर नंदकुमार घोडेले
यांनी अभिवादन केलं. बीड शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीनं महात्मा
फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.गोंदिया
जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिला मॅरेथॉन
स्पर्धा झाली.
****
विधानसभा निवडणुकीसाठी आज मध्यप्रदेश मध्ये दुपारी
चार वाजेपर्यंत अट्ठावन्न टक्के तर मिझोरममध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सदुसष्ट टक्के
मतदान झालं. मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.
//************//
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2018 13.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
महिला सुरक्षेशी संबंधित सगळ्या
खात्यांची लवकरच बैठक घेणार असून आश्रमशाळा आणि वसतीगृहांवर देखरेख ठेवण्याऱ्या पथकांची
स्थापना करण्याबाबत त्यामध्ये विचार केला जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर
यांनी आज विधानपरिषदेत दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी गळ्यात घालण्याकरता पदकासारखं
उपकरण तयार करण्याचा विचार करण्यात येत असून, त्याद्वारे पोलिसांची तत्काळ मदत उपलब्ध
होईल, अशी यंत्रणा उभारण्याचं, तसंच अशी योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं
राज्य ठरणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं. दरम्यान, नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया
थांबवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. हा
प्रकल्प रद्द करण्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी हे नमुद केलं.
****
विदर्भातल्या बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराची चौकशी
निष्पक्षपणे आणि पारदर्शीपणे सुरू असून, सरकार याप्रकरणी सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा
विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. या
घोटाळ्याला तत्कालीन अधिकारी, मंत्र्यांसह माजी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अजित
पवार जबाबदार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं न्यायालयाला सांगितल्याच्या बातम्या
माध्यमांमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते
धनंजय मुंडे यांनी आज सरकारवर टीका केली होती, त्यानंतर महाजन यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून, या प्रकरणाच्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य
करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
मध्य प्रदेश आणि
मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान
आज सकाळपासून सुरू आहे. सुरुवातीच्या तीन तासांमध्ये मध्यप्रदेश मध्ये पंधरा टक्क्याहून जास्त मतदान झाल्याचं, तर मिझोरम
मध्ये सुरुवातीच्या चार तासात एकोणतीस टक्क्यांहून जास्त मतदान झाल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश आणि मिझोराम मधील या निवडणुकीत
प्रामुख्यानं युवकांचं अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी आवाहन केलं आहे.
****
राजस्थान आणि तेंलगनामधील
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दोन्ही ठिकाणी एकाच टप्प्यात सात डिसेंबर
रोजी मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये २०० आणि तेलंगनामध्ये ११९ जागा आहेत. छत्तीसगड,
मध्यप्रदेश, मिजोराम, राजस्थान आणि तेलंगना या पाचही राज्यांतील मतमोजणी येत्या ११
डिसेंबर रोजी होईल.
****
देशातल्या वाढत्या
स्टार्ट उप उद्योगांची सूची तयार करण्याच्या दृष्टीनं भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक सर्वेक्षण
हाती घेतलं आहे. बँकेनं काल मुंबईमध्ये एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
या उद्योगांची एकूण उलाढाल, नफाक्षमता आणि मनुष्यबळ यांचा पूर्ण तपशील या सर्वेक्षणातून
हाती येणार असून, या उद्योगांना येणाऱ्या समस्यांचीही माहिती यातून मिळेल, असं बँकेनं
याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे. या सर्वेक्षणात सहभागी होता यावं, यासाठी बँकेनं सगळ्या
नोंदणीकृत स्टार्ट उप उद्योगांना यासाठीचा अर्ज पाठवला आहे.
****
लष्कर ए तोयबा या कुख्यात अतिरेकी संघटनेचा सदस्य
अतिरेकी नावीद जुट्ट हा काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत मध्ये मारला गेल्याची
माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत त्याचा सहभाग
असल्याचा संशय आहे. या चकमकीत अजून एक अतिरेकी ठार झाला असून, सुरक्षा दलाचे तीन जवान
जखमी झाल्याचंही वृत्त आहे.
****
भारताच्या अत्याधुनिक हायसिस या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठीची
उलट गणती आज पहाटे पाच वाजून अट्ठावन्न मिनिटांनी सुरू झाली. उद्या सकाळी नऊ वाजून
अट्ठावन मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथून पीएसएलव्हीसी ४३ या प्रक्षेपकाद्वारे
हा उपग्रह अवकाशात पोचवला जाईल. भूभागाच्या निरीक्षणाचं काम हा उपग्रह करणार असून,
आठ देशांचे तीस अन्य उपग्रहही या उपग्रहासोबत
प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2018 11.00AM
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
नाणार प्रकल्पग्रस्तांच्या
आंदोलनाचा मुदा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाचा
अध्यादेश रद्द करण्याची मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली. तर, उद्योग विभागानं भूसंपादनाची
कारवाई थांबवल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. महात्मा ज्योतीबा
फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सदस्यांनी त्यांना अभिवादन केलं.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. थोर समाजसुधारक, शिक्षणक्रांतीचे
अग्रणी आणि ज्यांनी मागास समाजाला प्रगतीच्या सूर्योदयाकडे नेलं, ते क्रांतिसूर्य महात्मा
जोतिबा फुले यांना पुण्यतिथीदिनी शत शत नमन, असं मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे.
****
जी ट्वेंटी
शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्जेंटिनाला रवाना होत
आहेत. पंतप्रधान तिथं शिखर परिषदेसह अन्य द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.
जी ट्वेंटी हा प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांचा एक अग्रणी मंच असून, त्यात गंभीर आर्थिक
आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं जागतिक धोरणं ठरवली जातात.
****
मध्य प्रदेश
आणि मिझोराम या राज्यांतलं विधानसभेच्या निवडणुकीसाठीचं मतदान आज सकाळी सुरू झालं.
मिझोरममध्ये चाळीस जागांसाठी दोनशे नऊ तर मध्य प्रदेश मध्ये दोनशे तीस जागांसाठी दोन
हजार आठशे नव्व्याण्णव उमेदवार आहेत.
****
एकोणपन्नासाव्या
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज पणजीमध्ये समारोप होत असून आज यात प्रसिद्ध
पटकथा लेखक सलीम खान यांना विशेष जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. नऊ दिवस
चाललेल्या या महोत्सवात सदुसष्ट देशांचे दोनशे बावीस चित्रपट दाखवले गेले.
*****
चौदाव्या
हॉकी विश्वचषक स्पर्धेला आज ओडिशातल्या भुवनेश्वर इथे सुरूवात होत आहे. या स्पर्धेच्या
पहिल्या फेरीचा पहिला सामना बेल्जियम आणि कॅनडा यांच्यात संध्याकाळी पाच वाजता, तर
दुसरा सामना यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.
*****
***
Subscribe to:
Posts (Atom)
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...