आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला
सीतारामन आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्या राष्ट्रपतींची भेट घेऊन
संसदेमध्ये दाखल झाल्या असून केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे. अर्थमंत्र्यांनी
तत्पुर्वी काल संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. २०२०
-२१ या आर्थिक वर्षात विकासाचा दर सध्याच्या पाच
टक्क्यांवरून साडे सहा टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट औद्योगिक क्षेत्राच्या कामगिरीवर
अवलंबून असल्याचं, या सर्वेक्षणात म्हटलं आहे. खातेधारकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या
प्रशासकीय कामकाजात सुधारणा तसंच कर भरणा, मालमत्ता नोंदणी,
नवीन व्यवसाय उभारणी आदी व्यवहार अधिकाधिक सुलभ करण्याची आवश्यकता या
अहवालातून मांडण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये पगारदार वर्गाला
प्राप्ती करात दिलासा मिळेल आणि ग्रामीण भागात गुंतवणूक होईल, अशी आशा काँग्रेस पक्षानं
व्यक्त केली आहे. कठीण परिस्थितीत असलेला सर्वसामान्य माणूस आणि उद्योग जगताला यात
मदत मिळावी, अशी अपेक्षाही काँग्रेस पक्षातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
****
दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला
एक दोषी विनय शर्मा याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे.
****
नाशिक इथं झालेल्या महाराष्ट्र
राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मिरज इथल्या इंद्रधनु कलाविष्कार संस्थेच्या ‘सा
प्रत्युक्षते’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. नागपूर इथल्या संस्कृत
भाषा प्रचारिणी सभेच्या नाटकाला दुसरा आणि नाशिकच्या कृपा शैक्षणिक सामाजिक
बहुद्देशीय संस्थेच्या नाटकाला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या
कडकनाथ कोंबडीपालन गुंतवणूक प्रकरणी स्वराज्य ऍग्रो कंपनीच्या
संचालकाला अटक करण्यात
आली आहे. सचिन बाळासाहेब पाटील असं
या संचालकाचं नाव तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणयात आला आहे.
****
No comments:
Post a Comment