Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प रोजगार, शिक्षण क्षेत्राला चालना देणारा असून सर्वसामान्यांचा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी याचं
स्वागत केलं आहे. रोजगार निर्मीतीसाठी गुंतवणूक वाढवण्याबाबत खास योजना, तरुणांनमध्ये कौशल्य वाढवण्यासाठी
खास प्रयत्न याद्वारे करण्यात
येणार असल्याचं ते म्हणाले. प्रत्येक राज्यात स्मार्ट सिटी, निर्यातीला
प्रोत्साहन तसंच देशाच्या
आर्थिक विकासावर भर देणारा
हा अर्थसंकल्प आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
हा केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या सध्याच्या
आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे,
अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आय. डी. बी.
आय. आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय,
रेल्वेचं खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचं दर्शन घडवतात अशी टिकाही त्यांनी यावेळी
केली. अर्थसंकल्पातून
व्यक्त करण्यात आलेले संकल्प आणि त्याच्या सिद्धीसाठी केलेल्या वित्तीय तरतुदी यात
विरोधाभास दिसून येते, देशाच्या वाढीचं प्रमुख स्त्रोत असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर
यात पूर्ण अन्याय झाल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
****
हा अर्थसंकल्प कंटाळवाणा असून बेरोजगारीच्या मुख्य
प्रश्र्नाची यात दखल घेण्यात आलेली नसल्याची टीका काँग्रेस पक्षानं केली आहे. अर्थसंकल्पामध्ये
कोणतेही ठोस उपाय, धोरणात्मक कल्पना नाहीत तसंच यातून सरकारची केवळ घोषणांची पोकळ भूमिका
स्पष्ट होते, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
****
या अर्थसंकल्पात काहीही नविन आणि महत्त्वपुर्ण तरतुदी नसल्याची टीका राष्ट्रवादी
कांग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महिला सशक्तीकरण आणि कल्याणासाठी
यात नवं काहीही नसल्याचं नमुद करताना हा
अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
****
या अर्थसंकल्पात शेतकरी, ग्रामस्थ, ओबीसी, मागासवर्गीय,
आदिवासी, महिला, युवा,
जेष्ठ नागरिक यांना आधार देणाऱ्या तरतुदी असल्याचं
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे
सुरू करणारं हे पहिलं सरकार असून रोजगार. शिक्षण, आरोग्य क्षेत्रांमध्ये
मध्यम वर्गांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रशंसा धोत्रे यांनी केली आहे.
****
औरंगाबाद मधल्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी अर्थसंकल्पाविषयी
संमिश्र प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. या अर्थसंकल्पात उद्योगांसाठी सकारात्मक आणि आक्रमक
बदल करण्यात आल्याची प्रतिक्रीया भारतीय उद्योग संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी
यांनी दिली. रोखे व्यवहारांतील गुंतवणूकदारांची या अर्थसंकल्पाविषयी नाराजी आहे. आणि
केवळ प्राप्तीकारासंबंधी फायदे देण्यात आले असून आर्थिकमंदी कमी करण्यासंदर्भात विचार
केला नसल्याची प्रतिक्रीया व्यापारी महासंघाचे दिपक पहाडे आणि अजय शहा यांनी दिली आहे.
****
राज्यातील किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध
पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं कडक कारवाई करावी, असे आदेश राज्य सरकारनं
आज दिले आहेत. गृह विभागानं या संदर्भातील शासनादेश जारी केला असून किल्ल्यांवरील मद्यपान
तसंच गैरवर्तन रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
****
परभणी महापालिका स्थायी समिती सभापतीपदी गुलमीर खान
यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राधिका गोमचाळे, सय्यद समरीन, नम्रता हिवाळे,
नागेश सोनपसारे, माधुरी बुधवंत, गवळण रोडे, अब्दूल कलीम, विकास लंगोटे आदींची यावेळी
विविध समित्यांच्या सभापतीपदी निवड करण्यात आली.
****
सोलापुर जिल्ह्यातील वैराग इथल्या एकाच कुटुंबातील
सहा जणांचा आज वेळापूर नजिक अपघाती मृत्यू झाला. शिवराज नागेश फलफले आणि त्यांच्या
कुटुंबातील सदस्य या भीषण अपघात मृत्यूमुखी पडले. हे कुटुंब जेजुरीच्या दर्शनाला जात
असताना त्यांची मोटार आणि ट्रक दरम्यान झालेल्या या अपघातील एका जखमीवर अकलूज इथं उपचार
सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या पिशोरचा
ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले याला चार हजार रूपयांची लाच घेतांना आज पकडण्यात आली
आहे. रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड आणि विहिर खोदकामाचा ग्रामसभेचा ठराव देण्यासाठी
घुले यानं प्रत्येकी एक हजार रूपये प्रमाणे चार जणांकडून या रक्कमेची मागणी केली होती.
*****
***
No comments:
Post a Comment