Friday, 5 March 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.03.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक ५ मार्च २०२१

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेरावीक ग्लोबल एनर्जी ॲण्ड एनवायर्नमेंट लीडरशीप पुरस्कार स्वीकारतील. वैश्विक उर्जा आणि पर्यावरणाप्रति समर्पित नेतृत्वाला सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसीएट सप्ताह २०२१ च्या औचित्यानं आज ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण ही देणार आहेत.

****

लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशभरात १ कोटी ७७ लाख ११ हजार २८७ नागरिकांना कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. देशव्यापी लसीकरणाला गेल्या १६ जानेवारीला सुरुवात झाली. २ फेब्रुवारीला ला आघाडी वर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली तर गंभीर आजार असणाऱ्या ४५ वर्षांपुढील व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास १ मार्च रोजी प्रारंभ झाला आहे.

सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात देशभरात १० लाख ९३ हजार ९५४ लोकांना लस देण्यात आली आहे.

****

राज्यातला उसाचा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून या हंगामात आत्तापर्यंत सुमारे साडेसातशे लाख टन उसाचं गाळप झालं आहे. त्यातून सुमारे ७५ लाख टन साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. या हंगामात एकंदर १८७ साखर कारखाने सुरु झाले, त्यापैकी २० कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. गाळप हंगाम संपलेले सर्व कारखाने सोलापूर जिल्ह्यातले आहेत.

****

कोरोनाचा फटका बसलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी ५० टक्के प्रीमियम सवलत देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर झाल्यानंतर काल पालिका महासभेत मंजूर करण्यात आला. ही सवलत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महापालिकेवर कोट्यवधीचा आर्थिक बोजा पडणार आहे.

****

परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात ‘माझं गाव, सुंदर गाव’ उपक्रमांतर्गत स्वच्छता आणि शोषखड्डे करण्याची मोहिम सुरू आहे. परभणी तालुक्यातल्या मांडाखळी या ग्रामपंचायतीमध्ये काल या उपक्रमाअंतर्गत लोकसहभागातून ग्राम स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...