Monday, 19 February 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र १९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

१९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. एक दूरदर्शी नेता, निर्भय योद्धा, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप छत्रपती शिवाजी महाराज हे असून त्यांचे जीवन प्रत्येक पिढ्यांना प्रेरणा देते असं पंतप्रधानांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांवर एक विशेष चित्रफीतही सामाजिक माध्यमावर सामाईक केली आहे.

****

मुंबई इथं राजभवनात तसंच शिवाजी पार्क इथं राज्यपाल रमेश बैस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. 

****

किल्ले शिवनेरी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह शिवप्रेमींची मोठी उपस्थिती आहे.

****

राज्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांतिचौक परिसरात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी असंख्य शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. दरम्यान, शहरातून वाहनफेरी देखील काढली जात आहे. सोलापूर शहरात काल रात्री बारा वाजता शिवाजी महाराज यांच्या जंयती सोहळ्याला प्रारंभ झाला असून धुळे इथंही शिवजयंती साजरी केली जात आहे.

****

दिल्ली इथं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून सरकारकडून सादर केलेल्या प्रस्तावाला शेतकरी प्रतिनिधींनी सहमती दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मुंबई इथल्या शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या अटल सेतूवरून राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बससेवा सुरू होणार आहे. ही बस प्रायोगिक तत्त्वावर उद्या २० फेब्रुवारीपासून स्वारगेट पुणे ते दादर अशी धावणार आहे.

****

मराठवाड्यातल्या युवक-युवतींसाठी नोकरी, व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला लातूर इथं होणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी, एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश एन एम आर एम लातूर डॉट इन, या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...