Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
जम्मू
काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत
चार दहशतवादी ठार झाले, मात्र यात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. अन्य तीन दहशतवादी
या चकमकीत जखमी झाले, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे. या परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच लष्करानं शोधमोहीम सुरु
केली. दहशतवाद्यांकडून काही हत्यारंही हस्तगत करण्यात आली आहेत.
****
सार्वत्रिक
आधारभूत उत्पन्न योजना देशाच्या काही भागात पुढच्या वर्षी प्रायोगिक तत्वावर सुरू करणार
असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं एका
कार्यक्रमात बोलत होते.
या
योजनेअंतर्गत मूलभूत गरजा भागवण्यासाठी गरिबांना किमान काही रोख रक्कम नियमितपणे दिली
जाईल. सध्याच्या सुधारणांमुळे गरीबीचं प्रमाण कमी होण्यास, जागतिक दर्जाच्या पायाभूत
सुविधा आणि उच्च दर्जाची स्पर्धाक्षमता प्राप्त करणं शक्य होणार असल्याचं ते म्हणाले.
सामाजिक फूट आणि बंड हे सामाजिक अन्यायासंदर्भात गंभीर प्रश्न असून त्यावर उपाय शोधणं
गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
राष्ट्रीय
उत्पादकता सप्ताह आजपासून सुरू होत आहे. देशभरात सर्वक्षेत्रांमध्ये उत्पादकता आणि
गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान हा सप्ताह
साजरा केला जातो. कपात, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापराद्वारे कचऱ्यातून नफा ही यंदाच्या
सप्ताहाची संकल्पना आहे. या सप्ताहादरम्यान कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, निबंध
आणि वादविवाद स्पर्धा आदि कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
****
ज्येष्ठ
समाज सुधारक दयानंद सरस्वती यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना
अभिवादन केलं आहे. दयानंद सरस्वती यांनी समाज सुधारणा आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या
कार्याचा प्रभाव आजही टिकून असल्याचं पंतप्रधानांनी सोशल मिडीयावर दिलेल्या संदेशात
म्हटलं आहे.
****
मूल
हवं असणं किंवा नसणं तसंच गर्भपात करणं अथवा मूल होऊ न देणं याबाबत निर्णय घेण्याचा
अधिकार स्त्रीला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी म्हटलं
आहे.
ते
नवी दिल्ली इथं एका चर्चासत्रात बोलत होते.आपल्या देशात जेव्हा मूल जन्माला घालण्याच्या
हक्काबाबत चर्चा होते, तेव्हा स्त्रियाचं मत
क्वचितच विचारात घेतलं जातं. यामुळे आजच्या अत्याधुनिक युगातही महिलांबाबत माणुसकी
दाखवली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मूल जन्माला घालण्याचा अधिकार स्त्रियांनाही
असल्याचं लोक विसरतात आणि नवरा किंवा कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तीच आपलं मत लादून
निर्णय घेतात. हे वास्तव असल्याचं न्यायमूर्ती सिक्री यावेळी म्हणाले. यासंदर्भात स्वत:चा
निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य स्त्रीला असलचं पाहिजे असं ते म्हणाले.
****
२०१५
साली मराठवाडा आणि विदर्भातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमुक्ती
योजना, परवानाधारक सावकारांच्या कार्यक्षेत्राबाहेरील
शेतकऱ्यांना लागू करण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा आवश्यक असल्याचं राज्य शासनानं
म्हटलं आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या एका
जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान शासनानं सादर केलेल्या शपथ पत्रात ही बाब नमूद करण्यात
आली आहे. परवानाधारक सावकारांच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा
दिल्यास, या कायद्याचं उल्लंघन होईल, असं शासनानं म्हटलं आहे. या कायद्यात सुधारणा
करणं विचाराधीन आहे. मात्र, यात अनेक आर्थिक आणि कायदेशीर गुंतागुंतीचे मुद्दे असल्यानं
त्याबाबत अंतिम निर्णय अद्याप घेतला नसल्याचं शासनानं म्हटलं आहे.
****
भारत आणि बांग्लादेश दरम्यान हैदराबाद इथं सुरु असलेल्या एकमेव कसोटी क्रिकेट
सामन्यात आज तिसर्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. बांग्लादेशचा पहिला डाव ३८८ धावांवर
संपुष्टात आला. भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दोन
बाद ३४ धावा झाल्या होत्या. विराट कोहली चार
तर चेतेश्वर पुजारा दहा धावांवर खेळत आहे. याआधी भारताचा पहिला डाव ६८७ धावांवर घोषित
केला होता.
****
पुणे
जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातल्या पाचाणे इथं प्रसादातून विषबाधा झालेल्या बहुतांश गावकऱ्यांना
काल उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. एका धार्मिक कार्यक्रमात पेढ्यांचा प्रसाद खाल्यानंतर
सुमारे अडीचशे जणांना विषबाधा झाली होती. पेढ्यांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे
तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
//**********//
No comments:
Post a Comment