आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ मे २०१७
सकाळी १०.०० वाजता
****
माजी
पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली अर्पण
केली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन
सिंग यांनी नवी
दिल्लीत राजीव गांधी यांच्या समाधीवर फुलं वाहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन
केलं.
****
कुठल्याही कारवाईदरम्यान वीरमरण
आलेल्या निमलष्करी दलाच्या प्रत्येक जवानाच्या वारसाला
एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
यांनी केली आहे. सिक्कीम मधल्या शेराथांग लष्करी तळावर आयोजित सैनिक
संमेलनात ते बोलत होते. जवानांच्या हौतात्म्याची
भरपाई पैशांनी होऊ शकत नाही, मात्र त्यांच्या पश्चात कुटुंबाची
आबाळ होऊ नये म्हणून नुकसान भरपाईत वाढ केली असल्याचं राजनाथसिंह म्हणाले.
****
रायगड जिल्हयात पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावं यासाठी निवडणूक यंत्रणा विविध उपक्रम राबवत आहे. बॅनर्स, पत्रकं अशा पारंपारिक
पध्दतीबरोबरच आता मतदानानंतर सेल्फी काढून पाठवल्यास मालमत्ता करात २५ टक्के सवलत देण्याचा
निर्णयही महापालिकेनं
घेतला आहे.
प्राप्त
स्वछायाचित्रांपैकी शंभर उत्कृष्ट सेल्फीची निवड केली जाईल
आणि या कुटुंबांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात मालमत्ता करात सूट
दिली जाणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. पनवेल महापालिकेसाठी २४ मे रोजी
मतदान होत असून २६ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
****
शासकीय इमारतींमध्ये एलईडी उपकरणं बसविण्याच्या
प्रकल्पात पुढाकार घेणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरलं आहे. यामुळे
राज्याची दरवर्षी सुमारे १७५
कोटी रुपयांची बचत होणार आहे. मुंबई इथं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या इमारतींमधील ऊर्जा कार्यक्षमता या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत
ही माहिती देण्यात आली. देशभरात सर्वसामान्यांच्या
घरांमध्ये ७७ कोटी एलईडी बल्ब बसवण्याच्या केंद्र शासनाच्या प्रकल्पामुळे
दरवर्षी ४० हजार कोटी रुपयांची वीजबचत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment