आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मुंबईत
आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या तिसऱ्या वार्षिक बैठकीचं औपचारिक उद्घाटन
त्यांच्या हस्ते होत आहे.
१९७५ साली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा
गांधी यांनी घोषित केलेल्या आणी बाणीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज काळा
दिवस पाळण्यात येत आहे. त्या निमित्त मुंबईत आयोजित आणी बाणी विरोधी कार्यक्रमात पंतप्रधान
सहभागी होणार आहेत. आपल्या जीवाची पर्वा
न करता आणी बाणी विरोधात ज्यांनी लढा दिला, त्यांच्या
प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
****
दरम्यान,
देशातला आणि बाणीचा काळ हा काळा अध्याय म्हणूनच देशाच्या स्मरणात राहिला असल्याचं पंतप्रधानांनी
ट्विटर संदेशात म्हटलं आहे. राजकारणानं त्या काळी नागरिकांबरोबरच विचार आणि कलात्मक
अभिव्यक्तीवरही निर्बंध घातले होते, असं सांगून त्यांनी, आणि बाणीचा सातत्यानं प्रतिकार
करणाऱ्यांना अभिवादन केलं.
****
राजर्षी
छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. त्या निमित्त आज सर्वत्र अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरात मिल कॉर्नर चौकातल्या शाहू महाराजांच्या पुतळ्यास
महापौर नंकुमार घोडेले, महानगर पालिका आयुक्त निपुण विनायक यांनी पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं. या वेळी समता फेरीही काढण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात बेंबळी इथल्या जिल्हा परिषद
कन्या प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शोभा गायकवाड आणि त्यांचे पती
सुधीर गायकवाड यांच्या सह त्यांचा सहकारी तुकाराम उंबरे यांना काल भ्रष्टाचार प्रतिबंधक
विभागानं दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत
आहार शिजवून देण्याचं काम मिळावं, यासाठी त्यांनी तक्रारदारा कडे लाच मागितली होती.
****
विदर्भ
तसंच मराठवाड्यात पुढच्या दोन दिवसांत चांगल्या
पावसाचा अंदाज आहे. परंतु २९ जून पासून दोन जुलै पर्यंत पावसाची शक्यता कमी असल्यानं, तापमान वाढीची
शक्यता आहे. ही स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी
तसंच लागवडीचं नियोजन करावं, असं
आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment