आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
मध्यप्रदेशच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर असून ते इंदूरमध्ये आयोजित शहरी विकास महोत्सवात सहभागी
होत आहेत. पंतप्रधान राज्यातल्या विविध भागांतील चार हजार कोटी रुपयांहून अधिक
गुंतवणूक केलेल्या अनेक शहरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. राजगढ
जिल्ह्यातल्या मोहनपुरा धरणाचं यावेळी लोकार्पण करण्यात येईल. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातल्या
शेतीसाठीची जलसिंचन योजना आणखी उत्तम होण्यास मदत होईल.
****
राज्यात प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची आजपासून
अंमलबजावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर काल मुंबईत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी
अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत प्लास्टिकची उत्पादनं तयार करणाऱ्या कारखान्यांवर
तातडीनं धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
****
शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा,
गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या
बांधापर्यंत पोहोचवणाची गरज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. पुणे
इथल्या वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये कृषी क्षेत्र शाश्वत आण
फायदेशीर या विषयावर आयोजत करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. शेती
व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्वत बनवण्यासाठी बहुस्तरीय धोरण आखण्याची गरज असल्याचं
ते म्हणाले.
****
जालना जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती़, ग्रामीण आणि
राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमधून खरीप हंगामासाठी आतापर्यंत एकूण ३१ हजार शेतकऱ्यांना सुमारे १६१ कोटी रुपयांच्या पीककर्जाचं वाटप करण्यात
आलं आहे़ पीककर्ज वाटपाला गती देण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांनी प्रमाणित केलेला पीकपेरा
स्वीकारावा, एक लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून मूल्यांकन आणि बेबाकी
प्रमाणपत्र घेऊ नये, तसंच डिजिटल सातबारा ऐवजी तलाठ्यांच्या स्वाक्षरीतला सातबारा स्वीकारावा,
असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिले आहेत़.
****
राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांनी आपल्या उद्दिष्टानुसार
पीक कर्जाचं वितरण करावं, असे आदेश हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले
आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment