आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
मराठा
आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं पत्रकार
परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात
जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेली मुदत येत्या २४ तारखेला संपणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेत आहेत. दरम्यान, आत्महत्या करून काहीही आरक्षण मिळणार नाही. आत्महत्या
करू नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
****
बीड जिल्ह्यात गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस विक्री करणाऱ्या
टोळीला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलं. मध्यप्रदेश
इथून गावठी कट्टे आणि काडतूसे आणून ते राज्यात विक्री केली जाई. या टोळीकडून एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसासह सहा मोबाईल आणि एक
चारचाकी जप्त केली आहे.
****
कोविड काळात मुंबई महानगरपालिकेत रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीत ५
कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमितता प्रकरणी माईलान लॅबोरेट्रीज आणि मुंबई
महानगगरपालिकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे
शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
****
धम्मचक्र
प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना कसल्याही प्रकारची
असुविधा होऊ नये,
म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचं
काल आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते लोकार्पण
करण्यात आलं. यावेळी माहिती पुस्तिकेचही अनावरण करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमावर अनेकांनी संशोधन
करत, हा उपक्रम सामाजिक बदलांचं माध्यम झाला आहे,
असं इग्नाइटिंग कलेक्टिव
गुडनेस या पुस्तकात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment