Sunday, 21 January 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र २१ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२१ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

अयोध्येत उद्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठाना सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात विविध ठिकाणी अनेक धार्मिक-सांकृतिक-सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी  आपल्या तामिळनाडू दौ-यात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राम सेतुची निर्मिती झालेल्या अरिचल मुनाई या ठिकाणी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी समुद्र किना-यावर पुष्प अर्पण केलं.

****

आगामी  काळात भारत जगातला सर्वात मोठं मेट्रोचं जाळं विस्तारलेला देश असेल असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. ते काल पुणे इथं  बोलत होते.

****

मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणाऱ्या जगातल्या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचं उद्घाटन काल पुणे इथं  केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी यांच्या हस्ते झालं.

****

निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारीत कार्यक्रमानुसार बीड जिल्ह्यातील मतदार यादी उद्या २२ जानेवारी ऐवजी मंगळवारी २३ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे. एक जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी मंगळवारी प्रसिध्द होईल.

****

चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा काल महाराष्ट्राच्या खेळांडुनी रिदमिक योगा आणि तलवारबाजी मध्ये दोन रौप्य आणि तीन कास्य पदकांची कमाई केली. दुपारच्या सत्रात महाराष्ट्राच्या स्वरा गुजर, युगांका राजम यांनी रीदमिक पेयर या क्रीडा प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. तर तलवारबाजी मध्ये वैयक्तीक प्रकारात काशिश बारड हिने कांस्यपदक पटकावलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या नमो चषक क्रीडा स्पर्धांमध्ये काल कबड्डी, धनुर्विद्या , शूटिंग बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन आदी स्पर्धा आकर्षणाचं केंद्रबिंदू होत्या. आज या स्पर्धेत खो- खो, कुस्ती, मल्लखांब आणि रस्सीखेच या खेळांचा थरार अनुभवता येणार आहे.

****

येत्या २४ तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

****

१९ वर्षांखालील पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, भारत-बांग्लादेश दरम्यान काल झालेला सामना भारतानं ८४ धावांनी जिंकला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...