Tuesday, 2 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 02.01.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 02 January 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जानेवारी २०२   दुपारी १.०० वा.

****

रिझर्व्ह बँकेकडं दोन हजाराच्या ९७ टक्के नोटा पुन्हा जमा झाल्या आहेत. बँकेनं गेल्या १९ मे रोजी दोन हजाराच्या नोटा वापरातून मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा साडे तीन लाख कोटीं रुपयांहून अधिक मूल्याच्या दोन हजाराच्या नोटा चलनात होत्या. डिसेंबर अखेर हे प्रमाण ९ हजार ३३० कोटींवर आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं एका पत्रकाद्वारे दिली आहे.

****

पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन पेट्रोलियम कंपन्यांनी केलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस अत्यावश्यक वस्तू कायद्यात येत असल्यानं पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या टँकरला संरक्षण देणारा आदेश राज्य सरकारनं जारी केला आहे. त्यामुळं एक-दोन ठिकाणं वगळता राज्यात इतरत्र पेट्रोल-डिझेल पुरवठ्याची परिस्थिती नियमित झाल्याची माहिती पेट्रोलियम कंपन्यांचे राज्य समन्वयक संतोष निवेकर यांनी आकाशवाणीला दिली. पेट्रोल-डिझेल पुरवठादारांच्या वाहनांमधून ६० ते ७० टक्के इंधनाची वाहतूक होते. हे टँकर चालक संपात सहभागी झालेले नाहीत. इतर टँकरचालकांकडून काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

****

संसदेनं मंजूर केलेल्या आणि ब्रिटिश काळातील कायद्यांची जागा घेणाऱ्या तीन नवीन फौजदारी संहिता विधेयकांना आव्हान देणारी जनहित याचिका काल सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

भारतीय दंड संहिता आयपीसी, फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा आयइए पुनर्स्थित करण्यासाठी संसदेनं नुकतीच भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम कायद्याची विधेयकं मंजूर केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ डिसेंबर रोजी तीन नवीन फौजदारी कायदे विधेयकांना संमती दिली आणि त्याचं अधिनियमात रुपांतर झालं. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची स्थापना आणि तीन फौजदारी कायद्यांच्या व्यवहार्यतेची तपासणी करण्यासाठी न्यायाधीश, वरिष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ यांचा समावेश करण्यात यावा, तसंच संसदेतील बहुसंख्य सदस्य निलंबित असताना तीन नवीन फौजदारी संहिता विधेयकं चर्चेविना मंजूर करण्यात आल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.

****

ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळं आज दुपारपर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळ जवळ सर्वच पंपावरील पेट्रोल-डिझेलचा साठा संपल्याचं वृत्त आहे. त्यामुळं फळ, भाजीपाला, दुध आणि औद्योगिक उत्पादनांच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. आज सकाळी काही पंपावर इंधन भरण्यासाठी वाहन चालकांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. दरम्यान, संप मिटेल आणि इंधन येईल तसंच संध्याकाळपर्यंत पंप सुरळीतपणे सुरू होतील, असा अंदाज पेट्रोलपंप व्यवस्थापनानं व्यक्त केला आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील नांदेड - वाशिम राष्ट्रीय महामार्गावर बासंबा फाटा इथं वाहन चालक-मालक संघटनेनं दुपारपासून चक्का जाम आंदोलन सुरू केलं आहे. वसमत तालुक्यातही कुरुंदासह जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यावर चालक-मालक संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

****

नाशिक जिल्ह्यातील येवला इथं एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचं काल रात्री जाहीर करण्यात आलं. हा रुग्ण अन्य व्याधींनीही ग्रस्त होता, असं आरोग्य  विभागानं स्पष्ट केलं. दरम्यान, नाशिक शहरात सध्या दहा कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असल्यानं त्यांच्यावर घरी तर अन्य तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  

****

विकसित भारत संकल्प यात्रा नांदेड जिल्ह्यात असून ५६५ गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहोचली आहे. या संकल्प यात्रेत जिल्ह्यातल्या २ लाख २० हजार ४०४ नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत ३ हजार ४५४ नागरिकांना सुरक्षा विमा योजनेचा तर १ हजार ५९३ नागरिकांना जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळाला. ५२ हजार २६४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्या आली असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार २७७ नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

२६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गावात संकल्प रथ येताच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अर्ज करावेत,सं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केलं आहे.

****

महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज दुपारी दीड वाजता मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 12 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 12 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...