Saturday, 4 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 04.05.2024, रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०४ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दाखल अर्जांची आज छाननी होत आहे. या टप्यात राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले आहेत.

****

निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लोकसभा निवडणुकीतल्या इच्छुक उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र कालबद्धरित्या समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात सर्व उमेदवारांसाठी प्रतिज्ञापत्रासह नामांकन अर्ज भरण्याच्या महत्वावर भर दिला आहे.

****

कांद्याच्या निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. परराष्ट्र व्यापार संचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा आदेश त्वरित लागू होणार असून, त्यासाठी किमान ५५० प्रति मेट्रिक टन निर्यात किंमत असणं गरजेचं आहे. गेल्याच महिन्यात केंद्रानं सहा देशांना ९९ हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली होती.

****

पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते.

गाडे यांनी दलित अत्याचार स्कॉलरशीप गायरान हक्कांसाठी लढा दिला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जवळपास ४७ दलित वसाहती त्यांनी बसवल्या. १९७७ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराचा पहिला ठराव मांडला होता. काँग्रेसच्या कार्यकाळात गाडे यांनी परिवहन राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

पैशाच्या व्यवहारात अनियमतता आणि सुचिबद्ध नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी सेबीनं अदानी समुहाच्या चार कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. यात अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी एनर्जी, अदानी गॅस अणि अदानी विल्मर या कंपन्यांचा समावेश आहे.

****

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकार्याला लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे. तक्रारदाराकडून आठ लाख रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयनं ही कारवाई केली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...