Saturday, 15 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 15 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

देश आज आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन राष्ट्रध्वज फडकावला. राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी ‘विकसित भारत २०४७’ चे स्वप्न साकार करण्यासाठी देशवासीयांच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला. देशाच्या विकासाला नवी गती देण्यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्राला सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर बनवण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात डिझाईन आणि उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, भक्कम दळणवळण, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, हरित आणि सागरी अर्थव्यवस्था आणि आरोग्य मनोरंजन पर्यटन या ‘सप्तधारा’ संकल्पनेवर विशेष भर दिला. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

दरम्यान, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वंदे मातरम् हे गीत लाल किल्ल्यावर गायलं गेलं. याविषयी पंतप्रधान म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनाबाबत त्यांनी माहिती सांगितली तसंच यावेळी विविध पुरस्कार पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या मदतीसाठी विविध अत्याधुनिक यंत्रांचे यावेळी लोकार्पण करण्यात आले.

दरम्यान, शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. पोलिस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी–कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

****

नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या मुख्य सोहळ्यास महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नांदेड महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री सावे यांनी जिल्ह्यातील विकास कामाची माहिती दिली. शेतकरी कर्जमाफीचा विशेष उल्लेख त्यांनी यावेळी केला. शासन शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी असल्याचंही ते म्हणाले.

****

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायलं. दरम्यान, बीड इथल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील ध्वजारोहण सोहळा अप्पर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते पार पडला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध शासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.

****

जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांबद्दल माहिती दिली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा आणि अधिकाऱ्यांचा यावेळी त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

****

धाराशिव इथं राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...