Wednesday, 8 February 2017


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०८ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथल्या अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर तोटरे याना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. महाविद्यालयातल्या एका प्राध्यापकाचं दोन महिन्यांचं वेतन अदा करण्यासाठी प्राचार्य तोटरे यानं लाच मागितली होती, यापैकी २० हजार रुपये रोख आणि एक लाख दहा हजार रुपयांची बँकेची विड्रॉवल पावती घेताना त्याला अटक करण्यात आली.

****

गोंदिया जिल्ह्यात धनेगाव इथं आदिवासी समाजाच्या प्रसिद्ध काली कंकाली यात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी देशभरातल्या १६ राज्यांमधून सुमारे पाच लाखांवर भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. हा भाग नक्षलग्रस्त असल्यानं, भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

****

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होईल असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केला आहे. विमानतळ बाधितांचे पुनर्वसन आणि पुनःर्स्थापन होत असलेल्या परिसराचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. या गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेला वेग देण्यात आला असून या क्षेत्रात पायाभूत सुविधा तसंच इतर कामे प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

विशेष बँक नोट दायित्व समाप्ती विधेयकाला काल लोकसभेनं मंजुरी दिली. यानुसार आता पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बाळगणे, दुसऱ्यांना देणं आणि दुसऱ्यांकडून घेणे, याला अपराध समजलं जाईल. अशा दहाहून अधिक जुन्या नोटा बाळगल्यास  दहा हजार रुपयांपर्यंत दंड होण्याची यात तरतूद आहे.

//******//



No comments: