Thursday, 9 February 2017


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०९ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

भारत-बांगलादेश दरम्यान खेळवल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून हैदराबादमध्ये इथं सुरुवात झाली आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन षटकात एक बाद दोन धावा झाल्या होत्या.

****

तटरक्षक दलाच्या चाळीसाव्या वर्धापनदिनानिमित्त गोवा इथं सुरक्षित सागरी क्षेत्रासाठी प्रादेशिक सहकार्यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. “सागरी क्षेत्रातील सुरक्षा आणि जनजागृतीला प्रोत्साहन देणं” हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश आहे. १० फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या परिसंवादात ५० पेक्षा जास्त परदेशी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

****

पारदर्शकता आणि गतिमान कामकाज, हा सरकारचं नवं मंत्र असल्याचं केंद्रीय ग्राम विकास पंचायती राज, पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. या अर्थसंकल्पात ग्रामीण रोजगार योजनांसाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

धनादेश अनादर प्रकरणी अंबाजोगाई न्यायालयानं दोषीला ६० हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठवली आहे. अंबाजोगाई इथल्या एका पतसंस्थेच्या कर्जदाराने दिलेला धनादेश न वटल्यामुळे पतसंस्थेनं त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. 

//****//

No comments: