आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ जून २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
समाज माध्यमांवर दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि शिवराळ
भाषा चिंतेचा विषय असून या संदर्भातील कायद्यातली अस्पष्टता दूर करण्याची गरज आहे,
असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन
सावंत यांनी राज्य सरकारवर समाजमाध्यमांतून व्यंगात्मक टीका केल्यानंतर त्यांना ऑनलाईन
धमकी मिळाली आणि शिवराळ भाषेचा सामना करावा लागला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्री काल
मुंबईत बोलत होते. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला या धमकीची चौकशी करण्याचे आदेश
आपण देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
पैठण इथल्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या
पंढरपूर पालखी सोहळ्याचा दुसरा मुक्काम काल अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात हादगाव इथं
झाला. गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचं स्वागत केलं. बीड जिल्ह्यात शिरूर
कासार तालुक्यातल्या कुंडलपारगाव इथं आज पालखीचा मुक्काम होणार आहे.
****
शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या
पाठिशी खंबीर पणे उभी राहिली आणि
यापुढंही उभी राहणार आहे, असं शिवसेना
नेते तथा मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. काल अंबाजोगाई इथं,
शेतकरी मदत केंद्रास भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना, त्यांनी ही भूमिका
व्यक्त केली. शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देत, दिलासा देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न
असल्याचं खैरे यांनी सांगितलं. वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून
देण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचं बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यावेळी म्हणाले.
****
आज छत्रपती राजर्षी शाहु यांची जयंती सामाजिक
न्याय दिन म्हणून ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे. लातूर इथं छत्रपती राजर्षी शाहु
महाराज यांना स्मारक समितीच्या वतीनं पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आलं. सामाजिक
न्याय विभागाच्या वतीनं शहरातून फेरी काढण्यात आली.
****
जून महिना संपत आला तरी रायगड जिल्हयात पुरेसा पाऊस
न झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून लावलेल्या भाताची रोपं आता करपायला लागली आहेत.
हवामान खात्यानं वेगवेगळे अंदाज देऊनही पाऊस येत नसल्याचं चित्र आहे, हवामान खात्यानं
आता उद्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment