आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ जून २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
जापानच्या ओसाका इथं
सुरु असलेल्या जी-ट्वेन्टी शिखर परिषदेच्या आज शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी
अनेक जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेत आहेत. पंतप्रधान मोदींची पहिली बैठक
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्याबरोबर झाली. महिला सशक्तिकरणाबाबत होणाऱ्या
विशेष कार्यक्रमातही पंतप्रधान सहभाग घेणार आहेत. जी-ट्वेन्टी शिखर परिषदेच्या मानवकेंद्रीत
भावी समाजाच्या संकल्पनेच्या अनुशंगानं शाश्वत विकास, सर्वसमावेशकता आणि असमानता या
मुद्यांवर चर्चा होणार आहे. परिषदेच्या चौथ्या आणि अंतिम सत्रात हवामान बदल, पर्यावरण
आणि उर्जा या मुद्दांवर चर्चा होईल, असं पिटीआयचं वृत्त आहे.
****
सरकारनं जुलै ते सप्टेंबर
या तिमाहीसाठी एनएससी अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पीपीएफ अर्थात सार्वजनिक
भाविष्य निर्वाहनिधीसह छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांनी कपात
केली आहे. बचत खात्यांवरचा व्याज दर मात्र वार्षिक चार टक्के इतका कायम ठेवण्यात आला
आहे. सरकारी निर्णयानुसार छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर दर तीन महिन्यांनी अधिसुचित
केले जातात. पीपीएफ आणि एनएससी वर आता सात पूर्णांक नऊ दशांश टक्के व्याज दर राहील
तर ११३ महिन्यांची मुदत किसान विकासपत्रावर सात पूर्णांक सहा दशांश टक्के व्याज दर
असेल.
****
पुण्यात पावसामुळं
एका गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून किमान पंधऱा मजुरांचा मृत्यू झाला आहे.
कोंढवा भागात काल रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास ही दूर्घटना घडली. मुंबईतही पावसाशी
संबंधित अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात
उमरी इथं एका महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
****
औरंगाबाद, नांदेडसह
जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल चांगला पाऊस
झाला.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका वगळता इतर
सर्व तालुक्यांमध्ये सरासरी ८० मिलिमीटर पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही सर्वत्र पाऊस पडत
असल्याचं वृत्त आहे. महाड, अलिबाग, पेणमध्ये रिमझिम सुरू आहे. त्यामुळे सावित्री, गंधारी
या नद्यांना पुर आला आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment